शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

जिलेबी, मिठाई वाटपावर निर्बंध येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 4:31 PM

स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्टला सार्वजनिकरीत्या केल्या जाणाऱ्या जिलेबी अथवा तत्सम मिठाई वाटपावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजिलेबी, मिठाई वाटपावर निर्बंध येण्याची शक्यताचौकाचौकांत जिलेबी, गुलाबजामसह मिठाईचे स्टॉल

कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्टला सार्वजनिकरीत्या केल्या जाणाऱ्या जिलेबी अथवा तत्सम मिठाई वाटपावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश काढल्याने कोल्हापूरचे जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. ठिकठिकाणी मांडलेल्या स्टॉल्सवर तसेच सार्वजनिकरीत्या मिठाई वाटप केल्यास कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने यंदा हे वाटप केले जाऊ नये अशी मागणी होत आहे.यंदा कोरोना संसर्गाचा धोका असल्याने सातारा जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिकरीत्या जिलेबीसह मिठाई तयार करता येणार नाही व तिचे वाटप करता येणार नाही असा आदेश काढला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याबद्दल उत्सुकता आहे.

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी, चौकाचौकांत जिलेबी, गुलाबजामसह मिठाईचे स्टॉल लावले जातात. त्यासाठी आदल्या दिवसापासूनच मांडव उभारले जातात. येथे मिठाई खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते.

ध्वजवंदन झाले की सार्वजनिकरीत्या या मिठाईचे वाटप करण्याची पद्धत आहे. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक व खासगी संस्थांच्या वतीने हे वाटप केले जाते. सध्या शाळा महाविद्यालये बंद असल्याने वाटपाचे प्रमाण होणार असले तरी संसर्गाचा धोका आहेच; त्यामुळे काही मंडळांनी व संस्थांनी स्वत:हून पुढाकार घेऊन मिठाईचे सार्वजनिकरीत्या वाटप न करण्याचा निर्णय घेतला आहे.-

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी