शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

Kolhapur North By Election: जयश्री जाधव उद्या साधेपणाने अर्ज भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 19:06 IST

दिवंगत चंद्रकांत जाधव यांनी आपल्या कामाच्या जोरावर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले आहे. त्यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणूकीला भावनिक किनार

कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांचा उमेदवारी अर्ज उद्या, बुधवार साधेपणाने भरण्यात येणार आहे.

सकाळी ११.३० वाजता बाळकृष्ण हवेली, हॉटेल पाटलाचा वाडा, जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी या ठिकाणाहून प्रमुख नेते मंडळी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार शिवसेनेचे शहराध्यक्ष जयवंत हारुगले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात म्हटले आहे की, काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीसाठी जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. दिवंगत चंद्रकांत जाधव यांनी आपल्या कामाच्या जोरावर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले आहे. त्यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणूकीला भावनिक किनार आहे. त्यामुळे कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने जयश्री जाधव यांचा अर्ज भरण्यात येणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत २९ जणांनी ५८ अर्ज नेले असून, एकाच उमेदवाराने सोमवारी अर्ज दाखल केला. यासाठी अर्ज भरण्याची मुदत २४ पर्यंत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी