Kolhapur North By Election: जयश्री जाधव उद्या साधेपणाने अर्ज भरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 19:06 IST2022-03-22T19:06:01+5:302022-03-22T19:06:33+5:30
दिवंगत चंद्रकांत जाधव यांनी आपल्या कामाच्या जोरावर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले आहे. त्यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणूकीला भावनिक किनार

Kolhapur North By Election: जयश्री जाधव उद्या साधेपणाने अर्ज भरणार
कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांचा उमेदवारी अर्ज उद्या, बुधवार साधेपणाने भरण्यात येणार आहे.
सकाळी ११.३० वाजता बाळकृष्ण हवेली, हॉटेल पाटलाचा वाडा, जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी या ठिकाणाहून प्रमुख नेते मंडळी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार शिवसेनेचे शहराध्यक्ष जयवंत हारुगले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीसाठी जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. दिवंगत चंद्रकांत जाधव यांनी आपल्या कामाच्या जोरावर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले आहे. त्यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणूकीला भावनिक किनार आहे. त्यामुळे कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने जयश्री जाधव यांचा अर्ज भरण्यात येणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत २९ जणांनी ५८ अर्ज नेले असून, एकाच उमेदवाराने सोमवारी अर्ज दाखल केला. यासाठी अर्ज भरण्याची मुदत २४ पर्यंत आहे.