शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

जयश्री बोरगीची अमेरिकेत ‘तिरंगी’ कामगिरी

By admin | Updated: July 5, 2015 01:20 IST

कोल्हापूरचे नाव उज्ज्वल : ‘वर्ल्ड पोलीस गेम्स’मध्ये तीन सुवर्णपदकांसह रौप्यही पटकावले

कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलाची आंतरराष्ट्रीय महिला धावपटू जयश्री बोरगी हिने व्हर्जिनिया (अमेरिका) येथे भरविण्यात आलेल्या विश्व पोलीस व फायर गेम्समध्ये धावण्याच्या स्पर्धेत शनिवारी तीन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक पटकावून नवा विक्रम प्रस्थापित केला. अमेरिकेतील फेअरफॅक्स राज्यातील व्हर्जिनिया येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत १८ ते २९ या वयोगटात भारतीय पोलीस दलातून सहभागी झालेल्या जयश्री बोरगी हिने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात पोलंडच्या वोजोटूवूच्च अ‍ॅना हिला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकाविला. फेअरफॅक्स राज्यातील जॉर्ज मेसन विद्यापीठाच्या मैदानात झालेल्या या स्पर्धेत बोरगी हिने ११:०३:२१ मिनिटे एम इतकी, तर वोजोटूवूच्च अ‍ॅना हिने ११:३८:२९ मिनिटे इतकी वेळ नोंदविली आहे. यापूर्वी याच प्रकारात डब्ल्यू. रहमान या भारतीय पोलीस दलातील धावपटूने ११:३१:२९ मिनिटे इतकी विक्रमी वेळ नोंदविली होती. हा विक्रमही बोरगी हिने मागे टाकला आहे. यासह तिने ५००० मीटर व १०,००० मीटर धावण्याच्या प्रकारातही सुवर्णपदक पटकाविले. पाच हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत मात्र ती दुसऱ्या स्थानावर राहिली. अशी कामगिरी करणारी महाराष्ट्र पोलीस दलातील ती एकमेव महिला ठरली आहे. (प्रतिनिधी)