बानगेतील जवानाचा चंदिगढ येथे ह्दयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 20:09 IST2022-01-21T20:00:04+5:302022-01-21T20:09:04+5:30

म्हाकवे :  भारतीय सैन्यदलातील जवान राकेश बाळासाहेब निंगुरे (वय-३३) यांचा चंदीगड येथे ह्दयविकाराने मृत्यू झाला. ते हवालदार या पदावर ...

Jawan Rakesh Balasaheb Ningure died of heart attack at Chandigarh | बानगेतील जवानाचा चंदिगढ येथे ह्दयविकाराने मृत्यू

बानगेतील जवानाचा चंदिगढ येथे ह्दयविकाराने मृत्यू

म्हाकवे :  भारतीय सैन्यदलातील जवान राकेश बाळासाहेब निंगुरे (वय-३३) यांचा चंदीगड येथे ह्दयविकाराने मृत्यू झाला. ते हवालदार या पदावर कार्यरत होते. रविवारी (दि.२३) सकाळी त्यांचे पार्थिव कागल तालुक्यातील बानगे या त्यांच्या मूळ गावी येणार आहे. अत्यंयात्रेनंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इंतमामात अत्यंसंस्कार होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या आकस्मित निधनाचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली.

जवान राकेश हे काल, बुधवारी चंदिगढ (पंजाब) येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. उपचार सुरू असताना आज त्यांचा ह्रदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला. राकेश हे २००७ मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या घराण्याला सैनिकी परंपरा आहे.

त्यांचे वडिल सैन्यातून निवृत्त झाले असून त्यांचा मोठा भाऊही सैन्यात सेवा बजावत आहे. त्यांच्या पश्चात आई ,वडिल पत्नी, दोन मुलं आणि भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, गावच्या उत्तरेकडील मैदानावर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी त्यांच्या अंत्यविधीची तयारी करण्यात आली आहे.

Web Title: Jawan Rakesh Balasaheb Ningure died of heart attack at Chandigarh