शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव जिल्ह्यातील जवान जम्मू-काश्मीरमध्ये शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST

संकेश्वर : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला-उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत नेर्ली (ता. हुक्केरी) येथील जवान चेतन बसवराज पाटील (वय २६, रा. ...

संकेश्वर : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला-उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत नेर्ली (ता. हुक्केरी) येथील जवान चेतन बसवराज पाटील (वय २६, रा. नेर्ली, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) यांना बुधवारी (दि. २) वीरगती प्राप्त झाली.

मंगळवारी (दि. १) रात्रीच्या सुमारास काश्मीरच्या बारामुल्ला (उरी) सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत चेतन हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सैनिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

लहानपणीच चेतनच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. चेतन व त्याचा लहान भाऊ दयानंद या दोघांचे पालनपोषण त्यांच्या आत्या शोभा बाबू गुंडाळी (रा. हेब्बाळ, ता. हुक्केरी) यांनी केले आहे. चेतनचे बारावीपर्यंतचे शिक्षण डी.एल. खोत ज्युनिअर कॉलेज हेब्बाळ येथे झाले होते. २०१४ मध्ये नाशिक येथे सैन्यदलात ते भरती झाले. दोन महिन्यांपूर्वी ते सुट्टीवर गावी आले होते. नेर्लीमध्ये चेतन यांची शेती असून वर्षभरापूर्वी बसवान मंदिर रोडलगत त्यांनी नवीन घर बांधले आहे.

चेतन शहीद झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. आज, शुक्रवारी चेतन यांच्या पार्थिवावर गावातील कावेरी हायस्कूलजवळील पाटील शेतवडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलीस व महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांकडून लाडक्या सुपुत्राच्या अंत्यविधीची तयारी सुरू आहे.

-----------------------------

* कुटुंबीय देशसेवेत

चेतन यांचे वडील बसवराज हेदखील सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे २० वर्षांपूर्वी निधन झाले आहे. लहानपणापासून आई-वडिलांच्या मायेला पोरका झालेला चेतन हा सैन्यदलात, तर त्याचा लहान भाऊ दयानंद हाही नौदलात आहे. सेवा बजावताना चेतनला वीरगती प्राप्त झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

-----------------------------

* चेतन पाटील : ०३१२२०२०-गड-०८