शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

‘जनसुराज्य’ची रणनीती आता मंगळवारी ठरणार

By admin | Updated: January 25, 2015 00:50 IST

वारणानगरला मेळावा : ‘गोकुळ,’ ‘केडीसीसी’ निवडणूक धामधूम

कोल्हापूर : जनसुराज्य शक्ती पक्षाची आगामी ‘गोकुळ’ व जिल्हा बॅँक (केडीसीसी) निवडणुकीची रणनीती मंगळवारी (दि. २७) निश्चित होणार आहे. यासाठी पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, हातकणंगलेसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा वारणानगर येथे आयोजित केला आहे. यामध्ये पक्षाने नेमकी कोणती भूमिका घ्यायची याबाबत विचारविनिमय होणार आहे. ‘गोकुळ’ दूध संघासाठी सत्तारूढ गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विरोधात शड्डू ठोकून आव्हान दिल्याने सत्तारूढ गटाने सावध हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये सरळ लढत झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या तीन-चार जागा निसटत्या फरकाने पराभूत झाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीसोबत जनसुराज्य, शेकापसारखे पारंपरिक मित्र होते; पण पाच वर्षांत कॉँग्रेस व राष्ट्रवादीत बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीची अजूनही ‘नरो वा कुंजरो वा’ अशीच भूमिका असल्याने त्यांच्या मित्रपक्षांत संभ्रमावस्था आहे. जनसुराज्य पक्षाच्या पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, हातकणंगले यांसह जिल्ह्यात संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे जनसुराज्य पक्षाच्या भूमिकेला ‘गोकुळ’सह जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत महत्त्व येणार आहे. जनसुराज्य पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष विनय कोरे यांनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना ‘गोकुळ’ व जिल्हा बॅँकेशी संलग्न संस्थांचे ठराव गोळा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार त्यांचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. ‘गोकुळ’ व जिल्हा बॅँकेच्या आगामी निवडणुकीत पक्षाने कोणती भूमिका घ्यावी, यासाठी वारणानगर येथे मंगळवारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये कार्यकर्त्यांची मते अजमावून घेऊन पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. (प्रतिनिधी)