जाब विचारल्याच्या रागातून पत्नीचा हल्ला, पतीची पोलिसात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 19:04 IST2021-03-09T19:00:21+5:302021-03-09T19:04:11+5:30

Crimenews Kolhapur- घरगुती कारणावरुन चक्क पत्नीनेच पतीवर हल्ला करुन त्याच्या डोक्यात स्टीलचा झरा मारण्याचा प्रकार रामानंदनगरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला. या हल्ल्यात पती जखमी झाला असून त्याने रुग्णालयात औषधोपचार घेतले व तडक पोलीस ठाण्याची पायरी चढत पत्नीच्या विरोधात तक्रार दिली.

Jab asks wife out of anger, husband runs to police | जाब विचारल्याच्या रागातून पत्नीचा हल्ला, पतीची पोलिसात धाव

जाब विचारल्याच्या रागातून पत्नीचा हल्ला, पतीची पोलिसात धाव

ठळक मुद्देजाब विचारल्याच्या रागातून पत्नीचा हल्ला, पतीची पोलिसात धाव रामानंदनगरात कृत्य, डोक्यात स्टीलचा झरा मारण्याचा प्रकार

कोल्हापूर : घरगुती कारणावरुन चक्क पत्नीनेच पतीवर हल्ला करुन त्याच्या डोक्यात स्टीलचा झरा मारण्याचा प्रकार रामानंदनगरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला. या हल्ल्यात पती जखमी झाला असून त्याने रुग्णालयात औषधोपचार घेतले व तडक पोलीस ठाण्याची पायरी चढत पत्नीच्या विरोधात तक्रार दिली.

पतीकडून वारंवार मारहाण होत असल्याच्या बहुतांशी तक्रारी पोलीस ठाण्याच्या पाचवीला पुजलेल्या असतातच. त्यामध्ये पत्नीच्या तक्रारीनुसार पतीवर गुन्हा नोंदवले जातात, पण अलीकडे पत्नीकडूनच वारंवार मारहाण होत असल्याच्या पत्नी शिवीगाळ करत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्याच्या संगणकावर नोंद होऊ लागल्या आहेत. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास असाच प्रकार घडला.

घरगुती कामानिमित्त पत्नी बाहेर गेल्याने ती परतल्यावर तिला तू मला न सांगता कोठे गेली होतीस? असा जाब विचारला. त्यावरुन दोघांत कडाक्याचे भांडण झाले. अखेर पत्नीनेच पतीला शिवीगाळ करत पतीच्या डोक्यात स्टीलचा झरा मारला. या हल्ल्यामुळे पती जखमी झाला, त्याने रुग्णालय गाठले. औषधोपचारानंतर तो थेट करवीर पोलीस ठाण्यात गेला, त्याने पत्नी शिवीगाळ करुन मारहाण करत असल्याची तक्रार दिल्याने पोलीसही अचंबित झाले. तक्रारीनुसार पोलिसांनी अखेर पत्नीवरच गुन्हा नोंदवला.

Web Title: Jab asks wife out of anger, husband runs to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.