शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कोेकणातला पंतप्रधान केला तरी फरक पडत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यात चार नव्हे तर ४० केंद्रीय मंत्री केले आणि कोकणातील पंतप्रधान केला तरी शिवसेनेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यात चार नव्हे तर ४० केंद्रीय मंत्री केले आणि कोकणातील पंतप्रधान केला तरी शिवसेनेला काहीही फरक पडत नाही, असा टोला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपला मंगळवारी येथे लगावला. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला एक नंरबचा पक्ष बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शहरात शिवसंपर्क अभियानच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. शासकीय विश्रामगृहात हा कार्यक्रम झाला. जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री सामंत म्हणाले की, विरोधकांनी कितीही शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष न देता पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. पाच वर्षात जे छळले आणि अजूनही विरोधक म्हणून छळत आहेत, त्यांचे आगामी काळात १२ वाजवण्यासाठी तयारी करावी. शिवसैनिक कोणी अंगावर आल्यास शिंगावर घेत असतो. तो कधीही शिंग घेऊन पुढे जात नाही. तीन पक्षांचे सरकार असले तरी प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. यामुळे आगामी सर्वच निवडणुकीत शिवसेनेचे नाव कमी होणार नाही, याकडे लक्ष द्या.

दुधवडकर म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे जिल्ह्यातील दोन आमदारही गेले. ते औषधलाही शिल्लक राहिले नाहीत. यावरून कपटनीतीचा अंत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

माजी आमदार क्षीरसागर म्हणाले की, गेल्या दोन महापालिकेच्या निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर झाल्याने कमी मतांनी शिवसेनेच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला; पण यावेळी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून घराघरात पक्ष पोहोचवत महापालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवण्याची तयारी शिवसैनिकांनी करावी.

माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, रविकिरण इंगवले, विजय देवणे यांची भाषणे झाली. गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव, डॉ. मिणचेकर, सामाजिक कार्याबद्दल हर्षल सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला. आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सत्यजित पाटील, ऋतुराज क्षीरसागर, मंगल साळोखे आदी उपस्थित होते. अंकुश निपाणीकर यांनी प्रास्ताविक केले. जयवंत हारूगले यांनी आभार मानले.

चौकट

गोकुळमधील मक्तेदारी मोडली

मंत्री सामंत म्हणाले की, गोकुळमध्ये आतापर्यंत विशिष्ट व्यक्तींचीच मक्तेदारी होती. ती मोडून काढली हे चांगले झाले. गोकुळमध्ये शिवसेनेचे सात संचालक झाले आहेत. यांनी नेहमी शेतकरी हितासाठी काम करीत राहावे. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेच्या तीन सदस्यांना सभापती म्हणून संधी मिळाली. त्यांनीही आपल्या पक्षाला कसे झुकते माप मिळेल, याकडे लक्ष द्यावे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

स्वत:च्या ग्रामपंचायतमध्ये सत्ता नसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी टीका मंत्री सामंत यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता केली. विधानसभेवेळी माझ्या पाठीत काही जणांनी खंजीर खुपसल्याने पराभव झाला. मंत्री पदाची संधी चालून आली होती, त्यावेळी एका नेत्याने विरोध केला, अशी टीका माजी आमदार क्षीरसागर यांनीही केली.