kolhapur: विनय कोरे यांना एनडीए बैठकीचे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 16:04 IST2023-07-17T16:02:15+5:302023-07-17T16:04:06+5:30
जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपचा घटक पक्ष

kolhapur: विनय कोरे यांना एनडीए बैठकीचे निमंत्रण
वारणानगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे उद्या, मंगळवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
दिल्ली येथील हॉटेल अशोक येथे मंगळवारी (दि. १८) सायंकाळी पाच वाजता नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एनडीए व मित्र पक्षांची विशेष बैठक होत आहे. जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपचा घटक पक्ष आहे. गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मित्रपक्षांचे देखील योगदान आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या बैठकीचे निमंत्रण आमदार कोरे यांना पाठविले आहे. आमदार डॉ. विनय कोरे हे आज, सोमवारी या बैठकीसाठी रवाना होणार आहेत.