शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

लैंगिक छळ प्रकरणांतील चौकशीचा अहवाल पावणेचार वर्षांपासून दडपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:39 IST

शिवाजी विद्यापीठात घडलेल्या लैंगिक छळाच्या चौकशीतील गैरव्यवहारांबाबत स्थापन केलेल्या चौकशी समितीचा अहवाल जून २०१६ पासून दडपून ठेवला आहे. या अहवालाची प्रत याचिकाकर्त्यांना उपलब्ध करून द्यावी. संबंधित प्रकरणांमधील दोषींवर कारवाई करावी. या प्रकरणांबाबतच्या चौकशीमधील गैरव्यवहारांपासून विद्यापीठाचा बचाव करण्याचा नारा हा स्त्री अभ्यास केंद्राने दिला आहे, अशी माहिती या केंद्राच्या संचालिका डॉ. मेधा नानिवडेकर यांनी दिली.

ठळक मुद्देलैंगिक छळ प्रकरणांतील चौकशीचा अहवाल पावणेचार वर्षांपासून दडपूनस्त्री अभ्यास केंद्राकडून ‘विद्यापीठ बचाव’चा नारा; मागणी करूनही कुलगुरूंची भेट नाही

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात घडलेल्या लैंगिक छळाच्या चौकशीतील गैरव्यवहारांबाबत स्थापन केलेल्या चौकशी समितीचा अहवाल जून २०१६ पासून दडपून ठेवला आहे. या अहवालाची प्रत याचिकाकर्त्यांना उपलब्ध करून द्यावी. संबंधित प्रकरणांमधील दोषींवर कारवाई करावी. या प्रकरणांबाबतच्या चौकशीमधील गैरव्यवहारांपासून विद्यापीठाचा बचाव करण्याचा नारा हा स्त्री अभ्यास केंद्राने दिला आहे, अशी माहिती या केंद्राच्या संचालिका डॉ. मेधा नानिवडेकर यांनी दिली.स्त्री अभ्यास केंद्राने लैंगिक छळाच्या चौकशीतील गैरव्यवहारांना सन २०१२ पासून ठाम विरोध केला आहे. ते गैरव्यवहार तत्कालीन कुलगुरूंच्या निदर्शनासही आणले. तक्रारदार मुली, स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कुलपतींकडे केली. त्यांच्या निर्देशांमुळे निवृत्त न्यायाधीश जे. एन. शानबाग यांची एकसदस्यीय समिती स्थापन केली. मात्र, ज्यांच्या प्रमादांची चौकशी करायची होती, तेच समिती स्थापन करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असल्यामुळे चौकशी दूषित झाली. तसेच ती गुंडाळण्यात आली.

समितीचे कामकाज जून २०१६ मध्ये पूर्ण होऊन अहवाल सादर केला गेला. मात्र, गेली पावणेचार वर्षे हा अहवाल दडपून ठेवला गेला आहे. या अहवालाची प्रत मिळावी, अशी मागणी केली आहे. जुलै २०१७ मध्ये विभागप्रमुखांच्या बैठकीतही लैंगिक छळाने पीडित विद्यार्थिनी व स्त्रियांना हजर होण्याची संधी न देताच चौकशी संपल्याचे समजल्याचा उल्लेख मी केला होता.

तत्कालीन कुलसचिव, उपकुलसचिवांनी संगनमताने अनेक गैरव्यवहार केले असल्याचे वारंवार कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले. पण, अद्याप त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. अनियमितता आणि गैरव्यवहार दूर करण्यासाठी स्त्री अभ्यास केंद्राने कुलगुरूंची अनेकदा भेट मागितली; पण ती आजवर मिळालेली नाही. लैंगिक छळाच्या चौकशीतील गैरव्यवहारांविरोधात केंद्राने पाठपुराव्याचा तपशील कुलगुरूंना पत्राने सादर केला असल्याची माहिती डॉ. नानिवडेकर यांनी दिली.

एकाही अहवालाची प्रत प्राप्त नाहीकुलपतींच्या आदेशानुसार दोन समित्या विद्यापीठात स्थापन झाल्या होत्या. तत्कालीन राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी दि. २३ मार्च २०१६ च्या पत्राद्वारे कळविल्यानुसार लैंगिक छळाच्या तक्रारींबाबत विद्यापीठातील अनियमिततांबाबत तथ्यशोधनासाठी नेमलेल्या समितीपुढे दि. ४ एप्रिल २०१६ आणि १६ एप्रिल २०१६ या दिवशी हजर होऊन मी निवेदने आणि पुरावे सादर केले आहेत. दुसºया समितीसही मार्च २०१७ मध्ये मी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. अद्याप एकाही समितीच्या अहवालाची प्रत मला प्राप्त झालेली नसल्याचे डॉ. नानिवडेकर यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठWomenमहिलाkolhapurकोल्हापूर