शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना ३६ लाखांचा तपास निधी

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

गृहखात्याची मंजुरी : कर्नाटक पोलिसांच्या धर्तीवर प्रवास भत्ता, दैनिक भत्ता, इतर खर्च मिळणार

कोल्हापूर : गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना बाहेरगावी, परराज्यांत जावे लागते. अशावेळी येणारा खर्च ते स्वत:च करत असतात. त्याची गृहखात्याने गांभीर्याने दखल घेत कर्नाटक पोलिसांच्या धर्तीवर प्रवास भत्ता, दैनिक भत्ता, सर्वसाधारण खर्चासाठी कोल्हापूर पोलिसांना सुमारे ३६ लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासासाठी येणारा खर्च आता पोलिसांना दिला जाणार आहे. एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपी परदेशात पळून गेल्यास त्याच्या शोधासाठी ‘अत्यावश्यक’ म्हणून विमान सेवेचाही पोलिसांना वापर करता येणार आहे.खून, अपहरण, दरोडा, फसवणूक, बलात्कार, आदी गंभीर गुन्ह्यांतील आरोपी बाहेरगावी किंवा परराज्यांत पळून जातात. त्यांच्या शोधासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जावे लागते. गुन्ह्यांच्या तपासासाठी विविध कारणांसाठी जो खर्च होतो, तो संबंधित तपासी अधिकारी स्वत:च करतात. त्यांना शासकीय अनुदानातून कुठलाही परतावा मिळत नाही. स्वत:च तपासासाठी खर्च करावा लागत असल्याने एखाद्या प्रकरणाचा तपास खोलपर्यंत होऊ शकत नव्हता. परराज्यांत गुन्हेगारांच्या तपासासाठी जायचे झाले तर पाच ते सहाजणांची टीम, वाहनांचा खर्च आवाक्याबाहेर जात असे. अशावेळी पोलिसांना कोणाकडून मदत किंवा अवैध व्यावसायिकांकडून नाईलाजास्तव पैसे घेण्याची वेळ येत असे. दरम्यान, पोलीस ठाणेनिहाय जर तपासणी अधिकाऱ्यास निधी मंजूर केल्यास त्यांचा तपासादरम्यान झालेला खर्चाचे देयक सादर करून त्याचा परतावा त्यांना मिळत जाईल. यासाठी तपास अनुदान मंजूर करण्याची मागणी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्यावतीने गृहखात्याकडे करण्यात आली होती. दरम्यान, अंतर्गत सुरक्षेबाबत नवी दिल्ली येथे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या परिषदेच्यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटक राज्याच्या धर्तीवर तपासी अधिकारी यांना पोलीस ठाणे किंवा घटक पातळीवर गुन्हे तपासादरम्यान येणाऱ्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी कार्यवाही करावी, असे सुचविले होते. त्यानुसार २०१३-१४ या वित्तीय वर्षासाठी महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तपासकामासाठी सुमारे १५ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले; परंतु कोल्हापूर पोलिसांना हे अनुदान प्राप्त झाले नव्हते. २०१५-१६ या वर्षासाठी मात्र पोलीस दलास ३६ लाखांचा तपास निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील आतापर्यंत आठ लाख रुपये तपासकामासाठी खर्च झाले आहेत. एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपी परदेशात पळून गेला, असेल तर त्याच्या शोधासाठी ‘अत्यावश्यक’ म्हणून विमानसेवेचाही पोलिसांना वापर करता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिसाला स्वत:चा पासपोर्ट काढण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. तसेच तपासकामासाठी बाहेरगावी गेल्यानंतर नाष्टा, जेवण, राहणे व अन्य कामांसाठी पोलिसांना खर्च करता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना हा तपास निधी वाटप करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)खबऱ्यांनाही मिळणार अनुदान गेल्या अनेक वर्षांपासून खबऱ्यांचे जाळे क्षीण होत चालले आहे. सध्या पोलीस खबऱ्यांचा फुकट वापर करत असल्याने खबऱ्यांनी त्यांची साथ सोडली आहे. गुप्तवार्ता संकलित करण्यासाठी पोलिसांना खबऱ्यांवरच अवलंबून राहावे लागते. गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी हे खबऱ्यांचे जाळे सक्षम करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. पोलिसांकडून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. पुन्हा हे खबऱ्यांचे जाळे सक्षम करण्यासाठी तपासनिधीतील काही रक्कम खबऱ्यांसाठी वापरणार आहेत.