शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विकासवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचे नाव, जिल्हा नियोजन सभेत निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:56 IST

जागा दिल्याच्या ऋणाची आठवण जपणार

कोल्हापूर : विकासवाडी (ता. करवीर) येथे साकारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याचा निर्णय बुधवारी (दि. ११) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाला. सर्व आमदारांच्या वतीने याबाबतचा ठराव केला असून, तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील यड्रावकर, राहुल आवाडे उपस्थित होते.आबिटकर म्हणाले, कोल्हापुरातील विकासवाडी येथे ३२ एकरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मंगळवारी मंत्रिमंडळाने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी दिली आहे. या स्टेडियमसाठी आम्ही १५ ते २० एकर जमिनीची मागणी केली होती. त्यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम साकारणार आहात, भविष्यात आणखी जागेची गरज पडेल, सोयीसुविधा निर्माण कराव्या लागतील असे सांगून ३० एकर जागा देऊ तसेच स्टेडियमच्या विकासासाठी निधीदेखील देऊ असे सांगितले होते. त्यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्याने कोल्हापुरात हा प्रकल्प होत आहे. अजितदादांची आठवण म्हणून या स्टेडियमला त्यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव आमदार अमल महाडिक यांनी मांडला. त्याला सर्व आमदारांनी अनुमाेदन देऊन हा ठराव करण्यात आला आहे. आता हा ठराव, निर्णय शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. त्यासाठी सर्व आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी करतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur International Cricket Stadium to be named after Ajit Pawar.

Web Summary : The international cricket stadium in Kolhapur will be named after the late Deputy Chief Minister Ajit Pawar. All MLAs supported the resolution, which will be sent to the government for approval. The stadium project was initiated with Pawar's support and funding.