शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

बावड्यात श्रीराम संस्थेच्या हॉलमध्ये संस्थात्मक अलगीकरण केंद्र सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST

कसबा बावडा येथे पॅव्हेलियन मैदानावरील बॅडमिंटन हॉलमध्ये महानगरपालिकेच्यावतीने कोविड सेंटर सुरू आहे. पण या सेंटरमध्ये सध्या ...

कसबा बावडा येथे पॅव्हेलियन मैदानावरील बॅडमिंटन हॉलमध्ये महानगरपालिकेच्यावतीने कोविड सेंटर सुरू आहे. पण या सेंटरमध्ये सध्या बेड शिल्लक नाहीत.

सध्या सौम्य लक्षणे असणारे कोविड रुग्ण गृह अलगिकरणात राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रुग्ण घरी राहिला तर घरातील इतर लोकांनाही संसर्ग होण्याचा संभव असतो.

ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार ऋतुराज पाटील यांनी संस्थात्मक अलगीकरण केंद्रासाठी पुढाकार घेतला आहे. श्रीराम सेवा संस्थेच्या हॉलमध्ये यासाठी जागा उपलब्ध आहे. याठिकाणी बेडची व्यवस्था करून महापालिकेच्यावतीने डॉक्टर नर्सेस तसेच औषधेही पुरवली जाणार आहेत. कसबा बावडा येथील डॉक्टरही स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सेवा देणार आहेत. डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत या सेंटरसाठी करण्यात येणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

या बैठकीवेळी महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे, श्रीराम संस्थेचे सभापती धनाजी गोडसे, उपसभापती संतोष ठाणेकर, माजी नगरसेवक मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार, संजय लाड, गजानन बेडेकर, प्रशांत पाटील, चेतन काळे, प्रवीण लाड, राजीव चव्हाण, विलास पिंगळे, प्रमोद पाटील उपस्थित होते.

फोटो : कसबा बावडा येथील श्रीराम संस्थेच्या हॉलमध्ये संस्थात्मक अलगीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी सूचना केल्या. यावेळी संस्थेचे चेअरमन धनाजी गोडसे, उपसभापती संतोष ठाणेकर, माजी नगरसेवक मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार, गजानन बेडेकर, राजीव चव्हाण, विलास पिंगळे, प्रमोद पाटील, प्रवीण लाड, प्रशांत पाटील, आनंदा करपे आदी उपस्थित होते.