शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन निर्मितीच्या ठिकाणी विद्युत जनरेटर बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST

कोल्हापूर : राधानगरी, मुरगूड, मलकापूर, कोडोली, सीपीआर, आयजीएम या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती तसेच उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे रिफिलिंग प्रकल्प ...

कोल्हापूर : राधानगरी, मुरगूड, मलकापूर, कोडोली, सीपीआर, आयजीएम या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती तसेच उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे रिफिलिंग प्रकल्प बसविण्यात येत आहे. या ठिकाणी विद्युत जनरेटर बसवावेत, येथील ट्रान्सफॉर्मरची क्षमता तपासून आवश्यकतेप्रमाणे ते बदलावेत, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई व कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी सर्वांनी नियंत्रण कक्षासाठी सेवा द्यावी, त्याबाबत तीन सत्रात नियोजन करावे, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शिवाजी विद्यापीठ येथील कोविड रुग्णालयात टास्क फोर्सने सेवा द्यावी, गृह विलगीकरणातील रुग्णांना रुग्णालयांनी सेवा पुरवावी. तसेच ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर खरेदी करावे, अशी सूचना केली.

यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील कोविड रुग्णालयात गरजूंना बेड उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय भरारी पथकामार्फत रुग्णालयाला भेट देऊन व्यवस्थापनाचे समुपदेशन करण्यात येणार आहे. ज्याला बेडची गरज नाही, अशा रुग्णांची हॉटेलमध्ये व्यवस्था करून त्यांच्यावर रुग्णालयामार्फत उपचार करण्यात येतील, असे सांगितले.

बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव, उपाध्यक्ष डॉ. गीता पिल्लई, सचिव डॉ. किरण दोशी, सल्लागार डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. नीता नरके, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. अमर आडके, डॉ. शीतल देसाई, डॉ. शीतल पाटील, डॉ. मुकुंद मोकाशी उपस्थित होते.

---

फोटो नं २६०४२०२१-कोल-पालकमंत्री बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना ऑक्सिजन निर्मिती व कोरोना रुग्णांना सेवा-सुविधा याबाबत सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.

--