कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत उदासीनता, महापालिकेच्या दारात कृती समितीचा शंखध्वनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:36 IST2025-12-16T17:35:29+5:302025-12-16T17:36:38+5:30

निवडणूक जाहीर झाल्याने हद्दवाढीचा प्रश्न गुंडाळला

Indifference regarding Kolhapur boundary extension kruti samiti knocks on the door of the Municipal Corporation | कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत उदासीनता, महापालिकेच्या दारात कृती समितीचा शंखध्वनी

कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत उदासीनता, महापालिकेच्या दारात कृती समितीचा शंखध्वनी

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडण्यात महापालिका प्रशासनही कारणीभूत असल्याचा आरोप करत कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महापालिकेच्या दारात शंखध्वनी केला. हद्दवाढीबाबत प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने उदासीनता दाखवली असा आरोप कृती समितीने केला.

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने आता काही वर्षे हद्दवाढ करता येत नाही. निवडणुकीच्या आधी हद्दवाढ करा म्हणत कृती समितीने आंदोलने, मोर्चे, निवेदने देऊन हद्दवाढीचा मुद्दा चर्चेत ठेवला होता; मात्र निवडणूक जाहीर झाल्याने हद्दवाढीचा प्रश्न गुंडाळला गेला आहे. त्यामुळे कृती समितीने शंखध्वनी करत प्रशासनासह लोकप्रतिनिधींचाही निषेध केला. याबाबतचे निवेदन प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हंटले आहे, गेल्या पाच वर्षांत प्रशासकांच्या काळात हद्दवाढ करण्याची संधी वाया घालवली. शहराची वाढलेली लोकसंख्या, वाढलेली वाहने, प्रदूषण यामुळे शहरात आनंदाने जगणे महाकठीण झाले आहे. जगण्याच्या मूलभूत अधिकारावर गदा आली आहे. त्यामुळे नागरिकांकडून घरफाळा वसूल करण्याचा अधिकार राहिलेला नाही. यावेळी माजी महापौर आर.के. पोवार, सचिन चव्हाण, ॲड.बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे, अविनाश दिंडे उपस्थित होते.

Web Title : कोल्हापुर विस्तार रुका; उदासीनता के खिलाफ प्रदर्शन, शंखनाद

Web Summary : कोल्हापुर शहर का विस्तार प्रशासनिक उदासीनता के कारण रुका। कार्रवाई समिति ने नगर निगम में शंखनाद कर विरोध प्रदर्शन किया, अधिकारियों की निष्क्रियता और प्रशासक के शासनकाल के दौरान अवसरों को चूकने की आलोचना की। उन्होंने बढ़ती आबादी, प्रदूषण और बुनियादी जीवन स्तर की चुनौतियों पर प्रकाश डाला।

Web Title : Kolhapur Expansion Stalled; Protest Against Apathy, Conch Shells Sounded

Web Summary : Kolhapur city's expansion is delayed due to administrative apathy. The action committee protested with conch shells at the municipal corporation, criticizing officials for inaction and missed opportunities during administrator's rule. They highlighted increased population, pollution, and challenges to basic living standards.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.