शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल परिस्थितीमध्ये १९६५ चे युद्ध भारताने जिंकले : दांडेकर

By admin | Updated: June 24, 2015 00:41 IST

--राजर्षी शाहू व्याख्यानमाला

कोल्हापूर : पाकिस्तानच्या तुलनेमध्ये जुनी युद्धसामग्री असतानाही भारतीय सैन्याने १९६५ चे युद्ध जिंकले. चीनविरुद्धच्या १९६२ च्या युद्धातील पराभव, पंतप्रधान नेहरूंचे निधन अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे युद्ध झाले, पण मोठ्या हुशारीने भारतीय सैन्याने लाहोरपर्यंत धडक मारली, असे प्रतिपादन युद्धशास्त्र अभ्यासक विश्वास दांडेकर यांनी केले. कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे शाहू स्मारक भवनात सुरू असलेल्या शाहू व्याख्यानमालेत मंगळवारी दांडेकर बोलत होते. भारत-पाक युद्धाची ५० वर्षे हा व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती पाटील होत्या. दांडेकर म्हणाले, चीनसोबत १९६२ मध्ये भारताचा विदारक पराभव झाला. या पराभवामुळे पंतप्रधान नेहरू खचून गेले. या युद्धानंतर त्यांचे निधनही झाले. नेहरूंनंतर लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान झाले. शास्त्री हे कमकुवत पंतप्रधान असा देशात आणि परदेशातही गैरसमज निर्माण झाला होता. अन्नधान्याच्या समस्येने देशाला ग्रासले होते. अशातच चीन आणि पाकची मैत्री वृद्धिंगत होत होती. अमेरिकेकडून पाकला ‘पॅटर्न’सारखे अत्याधुनिक रणगाडे व शस्त्रसामग्री मिळाली होती. त्यामुळे पाकने भारताविरुद्ध १९६५ चे युद्ध पुकारले.दांडेकर म्हणाले, या युद्धात लष्कराला युद्ध तंत्राबाबतचे निर्णय घेण्याची मुभा देत लाल बहादूर शास्त्रींनी हे युद्ध जिंकले. तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या बुद्धीची चुणूकही या युद्धादरम्यान देशाने अनुभवली. कच्छ, जम्मू-काश्मीर आणि पंजाब या ठिकाणी हे युद्ध लढले गेले पण कमीत-कमी शस्त्रसाठा खर्च करत भारतीय सैन्यांनी लाहोरपर्यंत धडक मारली. या युद्धात सैन्याला पंजाबमधील शेतकऱ्यांपासून ते जम्मू-काश्मीरमधील नागरिकांची कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत झाली. काश्मीरमधील जनतेने पाकमधून नागरिकांच्या वेषात आलेल्या सैनिकांना मदत केली नाही. पंजाबमधील शेतकऱ्यांनी भारतीय विमानतळ उद्ध्वस्त करण्यासाठी पॅराशूटमधून उतरणाऱ्या पाक सैनिकांना पकडले. अमृतसर ते लाहोर या दरम्यानच्या मार्गावरील पाकिस्तानी सैन्यांची ठिकाणे शोधून त्यांना चकवा देण्यासाठी सीमेवरील तस्करांनीही मदत केली. आज हुकूमशाहीचे खूप वेड आहे पण सैन्य आणि जनता यांचा काय संबंध असतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण सैन्य हे या देशातील जनतेमधूनच आलेले असते. भारतामध्ये अनेक जाती समुदाय आणि धर्म असले तरी, एकात्मता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. ही एकात्मता सैन्यातही असते. त्यामुळे भारतीय सैन्याकडून नागरी शासन बळकावण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. याउलट पाकिस्तान आणि बांगलादेशामध्ये सैन्याकडून सत्ता ताब्यात घेण्याचे प्रकार घडलेले आहेत. भारत-पाकिस्तान युद्धानंतरच्या पन्नास वर्षांत भारताने ही गोष्ट कमावलेली आहे. हुकूमशाही ही कोणत्याही देशाला धोकादायकच असते, असे मतही दांडेकर यांनी व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. भारती पाटील म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्धचे युद्ध जिंकले, याचा अभिमान बाळगला पाहिजे. या युद्धात काश्मीरमधील जनताही भारताशी एकरूप राहिली. प्रमुख वक्त्यांचे स्वागत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, डॉ. अशोक चौसाळकर, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासनाधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते. प्रा. सूर्यकांत गायकवाड यांनी आभार मानले.