शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप मतदार यादींवरील तक्रारींचा वाढता ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:44 IST

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रशासनाने तयार केलेल्या ८१ प्रभागांच्या प्रारूप मतदार यादींवरील तक्रारींचा आलेख वाढतच चालला आहे. शनिवारी ...

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रशासनाने तयार केलेल्या ८१ प्रभागांच्या प्रारूप मतदार यादींवरील तक्रारींचा आलेख वाढतच चालला आहे. शनिवारी १३५ हरकती दाखल झाल्या. त्यामुळे एकूण हरकतींची संख्या ३१२ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ निर्माण झाला असून, या घोळाची व्याप्ती आता मोठी होत असल्याचे दिसून येत आहे.

महानगरपालिकेच्या चार विभागीय कार्यालयातील चार उपशहर अभियंता यांच्यावर प्रारूप मतदार याद्यांचे काम सोपविले होते. त्यांच्या हाताखाली सर्वेअर, बीएलओ तसेच अन्य काही कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. प्रारूप मतदार याद्या तयार करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आधी अंतिम प्रभागरचनेचा अभ्यास केला नाही, घाईगडबडीत काम उरकुन मोकळे झाल्याचे स्पष्ट होत आहे.

जवळपास पस्तीस ते चाळीस प्रभागांतील यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाले आहेत. प्रभागाच्या सीमा रेषेवरील मतदारांच्या गल्ल्याच्या गल्ल्या दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झालेल्या पाहायला मिळत आहेत. त्याशिवाय मृत व्यक्तींची नावे तशीच राहिली असून, अनेक प्रभागांत मतदारांची नावे दुबार झाली आहेत. दोन-तीन प्रभागात तर एकाच गल्लीतील, एकाच कॉलनीतील मतदारांची नावे दोन-दोन प्रभागात राहिली आहेत. त्यामुळे प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम अतिशय निष्काळजी आणि बेफिकिरीने झाल्याचे दिसून येत आहे.

महापालिका निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांना तसेच त्यांच्या समर्थकांना मतदार यादीतील घोळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताना नाकीनऊ येऊ लागले आहे. भारतीय जनता पक्षाने तर या याद्याच रद्द करून नवीन कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. जेवढ्या तक्रारी वाढतील तेवढी प्रशासनाचीही डोकेदुखी होणार आहे. कारण दि. २३ फेब्रुवारीपासून दि. २ मार्चपर्यंत त्यांना याद्यातील त्रुटी दूर करून अंतिम यादी तयार करायची आहे आणि ती लगेच दुसऱ्यादिवशी म्हणजे दि. २ मार्च रोजी प्रसिध्द करायची आहे. याद्या दुरुस्तीसाठीचा कमी वेळ लक्षात घेता, कमीत कमी वेळेत जास्तीत-जास्त त्रुटी दूर करून याद्या निर्दोष करायचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

शनिवारी दाखल झालेल्या हरकती-

-गांधी मैदान कार्यालय - ३६

-शिवाजी मार्केट कार्यालय- ५६

-राजारामपुरी कार्यालय - ३२

- ताराराणी मार्केट कार्यालय - ११

- एकूण तक्रारींची संख्या - १३५

-शुक्रवारपर्यंत दाखल झालेल्या तक्रारी - १७७