शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-इको फ्रेंडली रंगांना वाढली मागणी-‘कोरोना’चा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 16:19 IST

चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसचा परिणाम आणि हानीकारक रंगांनी त्वचेचे होणारे नुकसान यामुळे यंदा इको फ्रेंडली रंगांना मागणी आहे. अनेकजणांनी घरगुती रंग बनवण्यास प्राधान्य दिले. तर ग्राहक रंग खरेदी करताना रंग स्थानिक आहेत ना, याची खात्री करीत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देइको फ्रेंडली रंगांना वाढली मागणी-‘कोरोना’चा परिणाम स्थानिक रंग-पिचकाऱ्यांनी बाजारपेठ रंगली

कोल्हापूर : चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसचा परिणाम आणि हानीकारक रंगांनी त्वचेचे होणारे नुकसान यामुळे यंदा इको फ्रेंडली रंगांना मागणी आहे. अनेकजणांनी घरगुती रंग बनवण्यास प्राधान्य दिले. तर ग्राहक रंग खरेदी करताना रंग स्थानिक आहेत ना, याची खात्री करीत असल्याचे चित्र आहे.उद्या शुक्रवारी सर्वत्र रंगपंचमी साजरी होत आहे. हा सण म्हणजे सगळ््यांना आपल्या रंगात रंगून टाकणारा दिवस. यानिमित्त मांडलेल्या विविध रंगांनी बाजारपेठ रंगली आहे. सध्या चीनसह अनेक देशांत धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसचा धसका सगळ््याच क्षेत्रांनी घेतला आहे.

रंगपंचमीला खेळले जाणारे रंग, पिचकाऱ्या यातील बऱ्यापैकी साहित्य चीनमधून येते. मात्र गेल्या दीड महिन्यापासून चीनमधील उद्योग बंद असल्याने तेथून कोणत्याही साहित्यांची आवक झालेली नाही. शिवाय गेल्या काही वर्षांत चायनीज उत्पादने खरेदी करण्यास जाणीवपूर्वक टाळले जाते.

या सगळ््याचा परिणाम म्हणून यंदा रंगपंचमीच्या बाजारातून चायनीज रंग आणि पिचकाऱ्या हद्दपार झाल्या आहेत. जे काही चायनीज रंग विक्रीसाठी आहेत, ते खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल नाही. उलट स्थानिक रंगांची आवर्जून मागणी केली जात आहे.शहरात पापाची तिकटी, बाजारगेट, पानलाईन, महापालिका परिसर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, मिरजकर तिकटी, गंगावेश, राजारामपुरी येथील बाजारपेठेत रंग आणि आकर्षक पिचकाऱ्या मांडल्या आहेत. कोरडे रंग आणि पाण्यातले रंग अशा दोन प्रकारांत हे रंग उपलब्ध आहेत.

खडी, पावडर व लिक्विड स्वरूपातील रंग खरेदी केले जात आहेत. जांभळा, लाल, निळा असे गडद रंग तसेच पाण्यातले रंग २० रुपयांना डबी याप्रमाणे विकले जात आहेत. सुट्टे रंग व पावडर दहा रुपयांपासून शंभर रुपयांच्या पॅकेटमध्ये आहेत. पिवडीला सध्या सर्वाधिक मागणी असून तर पाच किलो रंगाच्या पोत्याचा दर ४० रुपयांपासून ६० रुपयांपर्यंत आहे.रंगाच्या पोते खरेदीलाही प्रतिसाद मिळत असून, लहान मुलांसाठी पालकांकडून नैसर्गिक रंगाच्या खरेदीला मागणी आहे. रंगपंचमी सणातील महत्त्वाचा घटक असलेल्या रंगांच्या निवडीपासूनच पर्यावरणपूरकतेवर भर देण्याकडे कोल्हापूरकरांचा कल वाढत आहे. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सध्या बाजारात नैसर्गिक रंगांना वाढत असलेल्या मागणीमुळे पर्यावरणपूरक रंगपंचमीला कोल्हापूरकरांचा यंदाही प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.पीठ,भाज्यांपासून रंगगेल्या काही वर्षांत निसर्गमित्रसारख्या संस्था व शाळांमधून दिले जाणारे इको फ्रेंडली रंगांचे प्रशिक्षण यामुळे लहान मुलांमध्येही पर्यावरणपूरक रंगांविषयी जागरुकता वाढली आहे. अनेक विद्यार्थी गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर आणि खायचा रंग यापासून घरगुती पद्धतीने रंग बनवत आहेत. नैसर्गिक रंगांमध्ये तांदळाची पिठी, कॉर्नफ्लोअर आणि शाबुदाण्याच्या पीठापासून बनवलेले रंग उपलब्ध आहेत. याशिवाय पालक, बीट यापासून रंग बनवण्यात येत आहेत.

सध्या चायनीज रंग आणि पिचकाऱ्या बाजारपेठेत कमी आहेत. हे रंग आता खरेदी केले जात नाहीत. उलट स्थानिक रंगांना आणि साहित्यांना मोठी मागणी आहे. त्यातही प्रामुख्याने नैसर्गिक रंगांची विचारणा केली जाते.इरफान मणेर,व्यावसायिक

 

 

टॅग्स :corona virusकोरोनाkolhapurकोल्हापूरHoliहोळी