शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

honeytrap : सोनाली, प्रिया, दीपा, शियाचा मोहजाल.. व्यापारी होताहेत कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 12:39 PM

‘ती माझी बहीण- पत्नी आहे, त्यांची अब्रु लुटलीस, तुझ्यावर बलात्काराचाच गुन्हा नोंदवतो, तुझा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनाम करतो, अशा धमक्या देत या बड्या पैसेवाल्यांना ‘ब्लॅकमेल’ केले जात आहे. बदनामीच्या भीतीने ते पोलिसांकडे जात नाहीत. हाच धागा पकडून हे त्याची अहोरात्र आर्थिक पिळवणूक सुरू होते.

तानाजी पोवार

कोल्हापूर : सावधान...!! शिया, सिया, शीतल, सोनाली, सोनाक्षी, प्रिया, दीपा या तरुणींच्या मोहजालात अडकवून अनेक व्यापारी कंगाल होत आहेत. झटपट लाखो रुपये कमवण्याचा गुंडाचा तसा हा जुनाच म्हणजे २०१७ पासूनचा, पण पोलिसांची आताच नजर पडल्याने नवा फंडा म्हणावा लागेल. ‘ती माझी बहीण- पत्नी आहे, त्यांची अब्रु लुटलीस, तुझ्यावर बलात्काराचाच गुन्हा नोंदवतो, तुझा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनाम करतो, अशा धमक्या देत या बड्या पैसेवाल्यांना ‘ब्लॅकमेल’ केले जात आहे. बदनामीच्या भीतीने ते पोलिसांकडे जात नाहीत. हाच धागा पकडून हे त्याची अहोरात्र आर्थिक पिळवणूक सुरू होते.

तरुणींच्या मोहजालात अडकवून त्यांच्या साथीदारांना लाखो रुपये खंडणी देत असाल, तर तुमची ही आर्थिक पिळवणूक कदापिही थांबणार नाही. मोहजालात अडकवलेल्यांकडून झटपट लाखो रुपये कमवायचे, त्यांना बदनामीची धमकी द्यायची, मग झाले फत्ते काम. त्यातूनच त्यांचा लुबाडणुकीचा गेम होतो. खून, मारामाऱ्या, कुळं काढणं, खंडणी यांसारख्या गुन्ह्यात वेळ जातो तसेच पोलिसांचीही नेहमीच करडी नजर राहते. म्हणून पोलिसांना चकवा देऊन गुन्हेगारांनी हा नवा ‘हनीट्रॅप’चा मार्ग चोखाळला. व्यापाऱ्यांची गेले काही महिने, वर्ष खंडणी रुपाने आर्थिक पिळवणूक सुरू आहे. हे रोखण्यासाठी फसलेल्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे. आतापर्यंत पाच तक्रारी दाखल झाल्या, आणखी होण्याची शक्यता आहे.

अनोळखी महिलेशी चॅटिंग पडेल महागात

हनीट्रॅप’ करण्यापूर्वी बडे पैसेवाले शोधून त्यांच्यावर नियोजनबद्ध ट्रॅप लावला जातो. सुंदरीबरोबर चॅटिंग, त्यानंतर मिटिंग व पुढे लुबाडणुकीचे सेटिंग’ याचा अवलंब केला जातो, त्यामुळे अनोळखी महिलेशी चॅटिंग करत असाल तर सावधगिरी बाळगा.

महापालिकेचे पाच नगरसेवक

‘हनीट्रॅप’मध्ये महानगरपालिकेच्या मावळलेल्या सभागृहातील पाच नगरसेवकही गुंतल्याची चर्चा आहे. काहींनी बदनामीच्या भीतीने संबंधित महिलेला पैसेही दिले, नगरसेवकांना कोल्हापूर शहराच्या उत्तरेकडील हिलस्टेशनवरील लॉजवर नेऊन लुबाडल्याची चर्चा आहे. त्यापैकी एक नगरसेवक व्यावसायिक आहे, तर दोघांचा त्यांच्याच फ्लॅटवर ‘हनीट्रॅप’ झाल्याचे समजते. ‘हनीट्रॅप’साठी एकाच महिलेचा वापर वारंवार केल्याची चर्चा आहे. अनेक नगरसेवकांना Need friends in your Location? For datting, chatting, Frendship. plz call on [Name] 100/ Privacy assured. असे मेसेज आले, तर काहींना थेट नवा मित्र जोडायचा आहे म्हणून मराठीतूनही मेसेज व्हॉट्सॲपवर आलेत.

युवती वापरतात ‘टोपन’ नावे

आतापर्यंत युवतींची अनेक नावे तपसात पुढे आली, पण त्यांची टोपन नावे आहेत. त्यांची मूळ नावे व राहण्याचा पत्ता नेहमीच गोपनीय ठेवला आहे. त्यामुळे गुंड मिळाले तर दोनच महिला पोलिसांच्या हाती लागल्या, इतर महिलांही हाती आल्यावर नगरसेवक, बडे व्यापारी, बांधकाम व्यावसायिकांची नवे पुढे येतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhoneytrapहनीट्रॅपCrime Newsगुन्हेगारी