ठळक मुद्देजिल्ह्यात चार ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटनाचोरींची नोंद चार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये
कोल्हापूर : जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी , कुरुंदवाड या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील विविध ठिकाणी मोबाईल चोरीच्या चार घटना घडल्या. या चोरींची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये झाली.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोबाईल चोरीची फिर्याद आकाश रंगराव अस्ले (वय २३, मुळगाव म्हासुर्ली, राधानगरी, सध्या रा. महाकाली मंदीराजवळ,शिवाजी पेठ) यांनी दिली. त्यांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून नेला.
लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोबाईलची चोरीची फिर्याद ( स्नेहल संतोष लोहार (वय १९, रा. कुंभार गल्ली, चोकाक ) यांनी दिली आहे. त्या लक्ष्मीपुरी येथील बस थांब्यावरून रुकडी-माणगाव के.एम.टी.बसमध्ये चढत असताना पाठीवर अडकवलेल्या सॅकमधून त्यांचा मोबाईल अज्ञाताने लंपास केला.
तिसरी चोरीची घटना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. यामध्ये आरती सुधीर साखळकर (वय २७, रा. यादव कॉलनी, बँक ऑफ इंडियाजवळ, पेठवडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. दाभोळकर कॉर्नर सिंग्नल परिसरातील के.एम.टी.बस थांब्याजवळ त्या के.एम.टी.बसमध्ये चढत असताना त्यांच्या ड्रेसवरील ॲप्रनमध्ये ठेवलेला मोबाईल अज्ञाताने लंपास केला.
चौथी घटना कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. यात प्रविण प्रकाश ऐनापुरे (वय ३९, रा. औरवाड, ता. शिरोळ) यांनी दिली. ते कुरुंदवाड आठवडा बाजारामध्ये दौलतशहा दर्ग्यासमोर भाजीपाला खरेदी करीत होते. अज्ञाताने त्यांच्या खिशातील मोबाईल लंपास केला.
Web Title: Incidents of mobile theft at four places in the district
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.