नेर्लीत ऋतुराज पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:23 AM2021-09-25T04:23:04+5:302021-09-25T04:23:04+5:30

यावेळी नेर्ली विकासवाडी येथील विविध विकासकामांचे उद्घाटनही आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विकासवाडीतले अंतर्गत रस्ते ...

Inauguration of various development works at the hands of Rituraj Patil in Nerli | नेर्लीत ऋतुराज पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

नेर्लीत ऋतुराज पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

Next

यावेळी नेर्ली विकासवाडी येथील विविध विकासकामांचे उद्घाटनही आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

विकासवाडीतले अंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरण, आणि हायमास्ट दिवे, बेघर वसाहतीत काँक्रिटीकरण आणि गटर बेघर वसाहतींमध्ये रस्ते खडीकरण, अंगणवाडी इमारत शाळेची दुरुस्ती, प्रयोग शाळा डिजिटल रूमचे उद्घाटन, शिवस्मारक परिसराचा विकास या कामांचे उद्घाटन यावेळी झाले. यावेळी करवीर पंचायत समितीच्या सभापती मंगल पाटील, ‘गोकुळ’चे संचालक सरपंच प्रकाश पाटील, जिल्हा परिषद सदस्या सरिता खोत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, उपसरपंच राहुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय चौगुले, रायगोंडा पुजारी, अजित पाटील, निखिल पाटील उपस्थित होते.

फोटो

: २४ नेर्ली विकासकाम

नेर्ली (ता. करवीर) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी करवीर पंचायत समितीच्या सभापती मंगल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा परिषद सदस्या सरिता खोत, सरपंच प्रकाश पाटील, आदींसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Inauguration of various development works at the hands of Rituraj Patil in Nerli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.