मलकापूर - कोरोनाच्या भीषण परिस्थितीत मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात येत असलेला ऑक्सिजन प्लांट शाहूवाडी तालुक्यातील जनतेला वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी व्यक्त केले . मलकापूर ग्रामीण रुग्णालय शेजारी ऑक्सिजन प्लांटच्या विद्युत पुरवठा कामांचा भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते.
देशात कोरोनाचा प्रकोप सुरू आहे या परिस्थितीत कोरोना ग्रस्त नागरिकांना ऑक्सिजन पुरवठा तत्काळ होण्यासाठी शासनाने ऑक्सिजन प्लांट उभा करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध केला आहे . त्याचा भूमिपूजन समारंभ कार्यकारी अभियंता दीपक पाटील , डॉ आशुतोष तराळ यांच्या हस्ते करण्यात आला .
महावितरणचे कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी या प्लांटसाठी अन्य बाबींची पूर्तता होण्यापूर्वी वीज वितरण कडून आवश्यक असलेल्या कामास तत्काळ मंजुरी दिली . पंधरा दिवसापूर्वी शाहूवाडी तालुक्यातील दोन तरुण पती-पत्नीचा झालेला मृत्यू आणि त्या नंतर आईबापाला दुरावलेले दोन चिमुकली आजही मनाला चटका लावून जात आहेत. यामुळे माझ्या तालुक्यातील जनतेला कोरोना कालावधीत आरोग्य सुविधा तत्काळ मिळण्यासाठी उभा राहत असलेल्या ऑक्सिजन प्लांटसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी अधीक्षक अभियंता अंकुश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता ए. ए. शामराज , कनिष्ठ अभियंता एन. बी. काळोजे ,एस. एन. सणगर , साई इलेक्ट्रोकचे मालक आदी सह कर्मचारी उपस्थित होते.
०६ मलकापूर ऑक्सिजन प्लांट
फोटो
मलकापूर ग्रामीण रुग्णालय शेजारी ऑक्सिजन प्लांट विद्युत कामांचा शुभारंभ करताना दीपक पाटील , ए. ए. शामराज , एन. बी. काळोजे , डॉ. आशुतोष तराळ आदी .