यादव नगरत सराईत गुंड चीन्या उर्फ संदीप हळदकर याचा दगडाने ठेचून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 02:24 PM2022-09-25T14:24:36+5:302022-09-25T14:25:01+5:30

यादव नगरात  रेकॉर्ड वरील गुंड चिन्या उर्फ संदीप अजित हळदकर (वय २४) याचा अज्ञात तिघांनी ठेचून खून केला.

In Yadav Nagar gangster Chinya alias Sandeep Haldkar was stoned to death | यादव नगरत सराईत गुंड चीन्या उर्फ संदीप हळदकर याचा दगडाने ठेचून खून

यादव नगरत सराईत गुंड चीन्या उर्फ संदीप हळदकर याचा दगडाने ठेचून खून

googlenewsNext

कोल्हापूर :

यादव नगरात  रेकॉर्ड वरील गुंड चिन्या उर्फ संदीप अजित हळदकर (वय २४) याचा अज्ञात तिघांनी ठेचून खून केला. ही घटना शनिवारी रात्री  सव्वा अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील नागरिकांनीच पोलिसांना याबाबतची कल्पना दिली होती.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चिन्या उर्फ संदीप हळदकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याची पूर्वीपासूनचे रेकॉर्ड गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. नागरिकांना त्रास देणे, याप्रकरणी तो काही महिने तुरुंगात होता. पंधरा दिवसांपूर्वी तो जामिनावर सुटला होता. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याला स्थानबद्ध करण्याची कारवाई सुरू केली होती. दरम्यान रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविली. तात्काळ राजारामपुरी पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी व पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे आणि शहर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण हेही दाखल झाले. त्यांनी त्वरित आजूबाजूच्या परिसरातून चौकशी सुरुवात करीत अज्ञात हल्ली खोरांच्या शोधार्थ पथके तयार करून विविध ठिकाणी रवाना केली आहेत. शाहू विच्छेदनासाठी त्याचा मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या गुन्ह्याबाबतची नोंद घेण्याची काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: In Yadav Nagar gangster Chinya alias Sandeep Haldkar was stoned to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.