शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

घडवू घराघरांत संवाद; नको टीव्ही, मोबाइलचा नाद; कोल्हापुरात उपक्रमाला आले चळवळीचे स्वरूप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 13:55 IST

गावात सायंकाळी सात ते साडेआठ या कालावधीत मोबाइल आणि टीव्ही बंद

पोपट पवार

कोल्हापूर : मुलगा, नातू मोबाइलवर, सून टीव्हीसमोर, मग मनातलं बोलायचं कुणासमोर अशी ज्येष्ठांची झालेली अवस्था, तर दुसरीकडे सतत मोबाइलमुळे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे कधी काळी नात्यांच्या गोतावळ्यात गजबजलेला गावगाडा अबोल झाला आहे. मात्र, गावगाड्यातील हा विसंवादाचा दुष्परिणाम ओळखत कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप, वाठार, किणी, पेठवडगाव, नरंदे, खोची, तळसंदे या गावांनी सायंकाळी सात ते साडेआठ या कालावधीत मोबाइल आणि टीव्ही बंद करण्याचा उपक्रम राबविला. या गावांनी हे उपक्रम राबविल्यानंतर खरेच त्याचे परिणाम घराघरांत दिसतात का, याचा लोकमत प्रतिनिधीने धांडोळा घेतला असता सकारात्मक वास्तव समोर आले. या गावांनी ठरावीक वेळेत टीव्ही, मोबाइल बंद करून गावगाड्याला पुन्हा संवादाची वाट खुली करून दिली आहे. त्यामुळे या गावांनी घेतलेला हा निर्णय नातू - आजोबा, सासू - सून, मुलगा - आई यांचा तुटलेला संवाद जोडणारा ठरत आहे. मोबाइल आणि टीव्ही बंदच्या निर्णयाने माणसात माणूस राहिला, अन जेवणालाही चव आली, अशाच भावना या गावांमधील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.अंबपमध्ये प्रभावी अंमलबजावणीअंबपमध्ये हा उपक्रम २५ फेब्रुवारीपासून अंमलात आणला गेला. सरपंच दीप्ती माने यांनी सुरुवातीला हा उपक्रम राबविण्याअगोदर गावातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेतून आम्ही घरी गेलो की, आई टीव्ही पाहण्यात, तर बाबा मोबाइलमध्ये असल्याने आमच्याशी बोलायला कुणीच नसते, अशा या विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे सरपंच माने यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या वेळेत टीव्ही, मोबाइल बंद करण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी अनेक पालकांशी बोलून त्यांना विश्वासात घेतले. त्यामुळे हा उपक्रम अंबपमध्ये यशस्वी झाला आहे.जेवणाला चव आलीटीव्ही पाहत किंवा मोबाइलवर बोलतच स्वयंपाकघरातील जेवण बनते, हा हल्लीचा अनुभव आहे. त्यामुळे जेवणही रूचकर बनत नसल्याच्या तक्रारी ज्येष्ठांकडून केल्या जातात. मात्र, टीव्ही बंदचा उपक्रम राबविलेल्या गावांमध्ये मात्र, आता आमच्या घरातील जेवणाला चव आली असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

टीव्ही, मोबाइल बंदमुळे माणूस माणसात राहिला आहे. गावात दीड तास ही उपकरणे बंद करण्याची वेळ दिली असली तरी आता चार - चार दिवस आम्ही टीव्ही सुरूही करत नाही. - विद्याराणी विभुते, गृहिणी, अंबप.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMobileमोबाइलStudentविद्यार्थी