अवघ्या आठ महिन्यांतच नियतीने वृष्टीपासून आई-वडील घेतले हिरावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 14:26 IST2026-01-26T14:24:47+5:302026-01-26T14:26:38+5:30

कोगनोळी चेकपोस्टजवळ कार-कंटेनर अपघात, २ ठार

In just eight months fate took away vrishti parents dead in accident | अवघ्या आठ महिन्यांतच नियतीने वृष्टीपासून आई-वडील घेतले हिरावून

अवघ्या आठ महिन्यांतच नियतीने वृष्टीपासून आई-वडील घेतले हिरावून

कोगनोळी :ज्या बाळाने नुकतेच जग पाहण्यास सुरुवात केली, आई-वडिलांना ओळखण्यास सुरुवात केली. इतक्यात काळाने अपघातात दोन्हीही पालक हिरावून घेतले आणि अवघ्या आठ महिन्यांची वृष्टी आई वडिलांविना पोरकी झाली.

कोल्हापूर येथील उद्योजक जिगर हेतिका नाकराणी (वय २८) हे पत्नी हेतिका (२४. दोघेही रा. पाचगाव रोड कळंबा कोल्हापूर) व मुलगी वृष्टी तिच्यासह हुबळी येथील नातेवाइकांच्या विवाह समारंभासाठी गेले होते . तेथून परत येताना कोगनोळी आरटीओ चेक पोस्ट जवळ आले असता समोर उभ्या असलेल्या कटेनरला त्याच्या कारची जोराची धडक बसली. यामध्ये जिगर व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला

जिगर नाकरांनी यांचे नातेवाईक किमाजी नाना पटेल (रा. इचलकरजी यांनी ट्रक चालक इम्तियाज अन्तर अली याच्या विरोधात निपाणी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी है करीत आहेत

जिगर यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ व मुलगी असा परिवार आहे. आई-वडिलांनाही व्यवस्थित न ओळखलेल्या वृष्टीवर ओढवलेल्या या पोरकेपणामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title : त्रासदी: दुर्घटना में माता-पिता की मृत्यु, आठ महीने की बच्ची अनाथ

Web Summary : कोल्हापुर के जिगर और हेतिका नाकराणी की कोगनोली के पास एक दुर्घटना में मौत हो गई। वे शादी से लौट रहे थे। उनकी आठ महीने की बेटी, वृष्टि, अब अनाथ है। पुलिस ट्रक ड्राइवर की भूमिका की जांच कर रही है।

Web Title : Tragedy: Eight-Month-Old Orphaned After Parents Die in Accident

Web Summary : Kolhapur couple, Jigar and Hetika Nakrani, died in an accident near Kognoli while returning from a wedding. Their eight-month-old daughter, Vrishti, is now orphaned. Police are investigating the truck driver's role.

टॅग्स :Accidentअपघात