Kolhapur: चार वर्षांत पावणेचार कोटी भाविक अंबाबाई चरणी लीन, दानपेटीत किती रक्कम जमा झाली.. वाचा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 28, 2026 16:18 IST2026-03-28T16:18:07+5:302026-03-28T16:18:27+5:30

विकास आराखड्यांनंतर आणखी वाढ

In four years four and a half crore devotees have worshipped the feet of Ambabai Kolhapur | Kolhapur: चार वर्षांत पावणेचार कोटी भाविक अंबाबाई चरणी लीन, दानपेटीत किती रक्कम जमा झाली.. वाचा

Kolhapur: चार वर्षांत पावणेचार कोटी भाविक अंबाबाई चरणी लीन, दानपेटीत किती रक्कम जमा झाली.. वाचा

इंदुमती गणेश

कोल्हापूर : देशातील ५१ आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील एक देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरासरी वर्षाकाठी कोटीच्या आसपास भाविक येतात, तर मंदिरातून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला वर्षाला १५ कोटींवर उत्पन्न मिळाले. गेल्या पाच वर्षांत ३ कोटी ७३ लाख ५१ हजार ३९९ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानंतर यात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर अंबाबाई आणि कोल्हापूरचे नाव अधोरेखित होणार आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची ख्याती जगभर पोहोचल्याने वर्षागणिक भाविकांची संख्या वाढत आहे. फक्त नवरात्रोत्सवात २० लाखांवर भाविकांची नाेंद होते, याशिवाय वर्षभर भाविकांचा राबता असतो. विशेषत: मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी जास्त गर्दी असते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील चार वर्षांत सरासरी पावणेचार कोटी तर वर्षाला पाऊण कोटी भाविक अंबाबाईला येतात.

या काळात सर्वाधिक भाविक

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल, मे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या पाच महिन्यांत अंबाबाईला सर्वाधिक भाविक येतात. एप्रिल-मेमध्ये उन्हाळी सुट्ट्या, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या, तर डिसेंबरमध्ये नाताळच्या सुट्ट्या असतात. त्यामुळे या काळात सर्वाधिक भाविक येतात.

यामुळे भाविकांत वाढ

- अंबाबाई मंदिराची ख्याती, महात्म्य देशपातळीवर पोहोचली
- विमान, रेल्वेसह दळणवळणाच्या साधनात वाढ
- हरिप्रिया एक्स्प्रेसमुळे थेट तिरुपतीहून भाविक काेल्हापुरात
- शाही दसरा महोत्सव, पर्यटन महोत्सव यांसारख्या उपक्रमांचा फायदा
- विकास आराखडे

साल : भाविक संख्या

२०२२ : ९१ लाख ५२ हजार ०८२
२०२३ : ९३ लाख १५ हजार ०९०
२०२४ : ९४ लाख ९८ हजार ६०७
२०२५ : ९३ लाख ८५ हजार ६२०
एकूण : ३ कोटी ७३ लाख ५१ हजार ३९९

फेब्रुवारी, मार्चमध्ये १ कोटी ४० लाखांचे उत्पन्न

अंबाबाई मंदिरातील १२ दानपेट्यांमधील रकमेची मोजणी गेल्या चार दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडून सुरू होती. ही मोजणी शुक्रवारी पूर्ण झाली. मागील दोन महिन्यांत १ कोटी ४० लाख ६१ हजार ८६५ इतकी रक्कम दानपेटीत जमा झाली आहे.

Web Title : कोल्हापुर: चार वर्षों में करोड़ों भक्तों ने किए अंबाबाई के दर्शन, दान में आए करोड़ों।

Web Summary : कोल्हापुर के अंबाबाई मंदिर में चार वर्षों में 3.73 करोड़ से अधिक भक्तों ने दर्शन किए, जिससे वार्षिक राजस्व ₹15 करोड़ से अधिक रहा। फरवरी और मार्च में दान ₹1.4 करोड़ था। बढ़ती पहुंच और पर्यटन पहल भक्तों की संख्या बढ़ाती हैं।

Web Title : Kolhapur: Millions visit Ambabai temple; donations reach crores in four years.

Web Summary : Over 3.73 crore devotees visited Kolhapur's Ambabai temple in four years, with annual revenue exceeding ₹15 crore. Donations in February and March totaled ₹1.4 crore. Increased accessibility and tourism initiatives drive devotee numbers.