शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: 'निष्ठेला हाच का तो न्याय?'; सुरेश हाळवणकर यांच्या समर्थकांनी पोस्टर झळकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 14:26 IST

नेत्यांचा पक्षप्रवेश पण निष्ठावंत कार्यकर्त्यांचे काय? 

दुर्वा दळवी कोल्हापूर: इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांचा काहीच दिवसांपूर्वी पक्षप्रवेश भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित पार पडला. आवाडेंचे कट्टर विरोधक आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनाच आवाडे पिता-पुत्रांना हात धरून व्यासपीठांवर पक्ष प्रवेशासाठी आणण्याची सूचना करण्यात आली होती. ज्या विरोधकांमधून एकेकाळी विस्तव ही जात नव्हता त्यांना एकत्र बघून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण गुरुवारी पुन्हा एकदा हाळवणकर-आवाडे यांच्यातील 'दूरी' अधिक तीव्रतेने दिसून आली. इचलकरंजी येथे काल, गुरुवारी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हाळवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी थेट बावनकुळे यांच्यासमोर 'निष्ठेला हाच का न्याय?' असे पोस्टर झळकावले. तर मनोगत व्यक्त करताना हाळवणकर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्यामुळे हाळवणकर गटातील नाराजी आता समोर आली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून ही ते ह्या मेळाव्याला उपस्थित नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवाडे पिता-पुत्राचा भाजपात झालेला पक्षप्रवेश पाहून नेत्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात मात्र चांगलीच घालमेल झाली. पक्षप्रवेश होऊनही दोन नेत्यांमध्ये असणारी नाराजी, कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद आता बाहेर पडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच बावनकुळे यांच्या उपस्थित पार पडलेल्या मेळाव्यात फक्त हाळवणकर गट दिसून आला. नेत्यांचा पक्षप्रवेश पण निष्ठावंत कार्यकर्त्यांचे काय? आवाडे यांची मेळाव्याला अनुपस्थिती आणि हाळवणकर गटाची नाराजी यामुळे इचलकरंजीत कमळ फुलवण्यासाठी हाळवणकर आणि आवाडे यांचे कार्यकर्ते कामाला लागणार का? तसेच नेत्यांसोबत कार्यकर्त्यांचे मनोमिलन कधी होणार अशी चर्चा ही आता जिल्ह्यात रंगलेली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीBJPभाजपाSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकरPrakash Awadeप्रकाश आवाडे