इराण-इस्रायल युद्धाच्या झळा भारताला बसू लागल्या आहेत. गॅस तुटवड्याचा मुद्दा चर्चेत असतानाच आता पेट्रोल-डिझेलबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये पेट्रोल-डिझेल मिळणे बंद होण्याची भीती निर्माण पेट्रोल पंपावर गर्दी होऊ लागली आहे. कोल्हापुरातही असेच प्रकार सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मोटारसायकल आणि चारचाकींसाठी पेट्रोल-डिझेल भरण्याची मर्यादा निश्चित केली आहे. तसेच आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत.
गॅस तुटवड्याबरोबरच पेट्रोल-डिझेलच्या टंचाईबद्दलही वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात असून, लोकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याचे फलक लावले गेल्याने भीतीमध्ये भर पडत आहे. त्यामुळे लोक जास्तीत जास्त इंधन भरण्यासाठी गर्दी करत असून, त्यामुळे मागणी आणि पुरवठा यात असमतोल निर्माण होत आहे.
कोल्हापूर पेट्रोल-डिझेल खरेदीवर मर्यादा
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५ आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम-१९५५ मधील अधिकारांचा वापर करून इंधनविक्रीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हे आदेश काढले आहेत. ३१ मार्चपर्यंत नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त इंधन देणाऱ्या आणि भरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार, मोटारसायकलमध्ये २०० रुपयांपर्यंत, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना २००० रुपयांपर्यंत इंधन देता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कॅन, बॉटल किंवा इतर कुठल्याही भांड्यामध्ये पेट्रोल देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवांना मूभा
रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवा, शासकीय यंत्रणा आणि इतर अत्यावश्यक वाहनांना इंधन पुरवठा करताना प्राधान्य देण्याचा निर्णयही जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पेट्रोल पंपाला प्राप्त झालेले इंधन आणि उपलब्ध इंधन साठा यांची माहिती फलकांवर लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Web Summary : Kolhapur restricts fuel purchases due to panic buying fueled by shortage rumors. Two-wheelers capped at ₹200, four-wheelers at ₹2000. Essential services prioritized. No fuel in containers allowed. Restrictions until March 31st.
Web Summary : कोल्हापुर में कमी की अफवाहों के कारण दहशत में खरीदारी से ईंधन खरीद सीमित। दोपहिया वाहनों के लिए ₹200, चौपहिया वाहनों के लिए ₹2000 की सीमा। आवश्यक सेवाओं को प्राथमिकता। कंटेनरों में ईंधन की अनुमति नहीं। 31 मार्च तक प्रतिबंध।