शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक वृक्ष तोडण्यास तात्काळ परवानगी  : आयु्क्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:37 IST

धोकादायक झाड तोडण्यासाठीची परवानगी तात्काळ दिली जाईल. प्रथम माझ्याकडे अर्ज येईल. त्यानंतर वृक्षप्राधिकरणाकडे पाठविला जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

ठळक मुद्देधोकादायक वृक्ष तोडण्यास तात्काळ परवानगी : आयु्क्तवृक्षप्राधिकरणाची समिती बरखास्त करण्याची मागणी

कोल्हापूर : धोकादायक झाड तोडण्यासाठीची परवानगी तात्काळ दिली जाईल. प्रथम माझ्याकडे अर्ज येईल. त्यानंतर वृक्षप्राधिकरणाकडे पाठविला जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

चार दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समिती सभा वृक्षप्राधिकरण समिती सदस्य उदय गायकवाड यांच्यावरुन वादळी झाली होती. स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांनी सोमवारी यासह विविध विषयासंदर्भात सोमवारी आढावा बैठक घेतली. यावेळी आयु्क्तांनी हा निर्णय जाहिर केला. महापौर निलोफर आजरेकर अध्यक्षस्थानी होत्या.गटनेते सत्यजीत कदम यांनी वृक्षप्राधिकरणाची कमिटी बरखास्त करुन नवीन कमिटी नेमून ती महासभेस सादर करावी, अशी सूचना केली. ई वॉर्डातील पुरबाधितांना शासकिय सलवतीचा लाभ द्यावा. अपार्टमेंटमध्ये अंदाजे रिडींग टाकून बिले दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.गटनेत शारंगधर देशमुख यांनी लॉकडाऊनमधील व्यापारांचे पाणी बिल घरगुतीने घ्यावे. तसेच या दरम्यानची बीलात दंड करु नये,अशी सूचना केली. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, सभागृहनेता दिलीप पोवार, नगरसेवक भूपाल शेटे, राहूल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई आदी उपस्थित होते.लावलेली झाडे रुंदीकरणात तोडली जावू नयेतएखादा ४० फुटी डीपी रस्ता कागदावर असतो. पण प्रत्यक्षात ३० फुटाचाच वापर होत असल्याने १५ हजार वृक्ष नेमकी कुठे लावाणार आहेत. टिपीकडील सर्व्हेचा अभिप्राय घ्यावा. अन्याथा लावलेली झाडे कालांतराने रस्ता रुंदीकरणात पुन्हा तोडली जातील. लाईटच्या पोल व वायरींगखाली झाडे लावू नयेत, अशा सूचना विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांनी केल्या.

शहरात जर एखादे धोकादायक झाड तातडीने तोडायचे असेल तर त्यासाठी माझी स्वाक्षरी घेऊन तात्काळ परवानगी घ्यावी. त्यानंतर धोकादायक वृक्ष तोडनीबाबत वृक्षप्राधिकरण समितीपुढे ठेवू. येथून पुढे सेवानिवृत्त वनविभागाचे उपवनसंरक्षक व्ही.डी.सावंत अर्जांची छाननी करतील. त्यानंतर कमिटी निर्णय घेईल. ओपनस्पेसमध्ये प्राधान्य देऊन वृक्षारोपन करण्यात येत आहे. पाणी बीलात कोणताही दंड आकारण्यात आला नाही.- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयु्क्त महापालिका. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर