आचारसंहिता भंगाच्या तक्रारीची आता तात्काळ दखल-निवडणूक आयोगाचे अॅप : पुण्यात कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 20:45 IST2019-02-11T20:44:09+5:302019-02-11T20:45:49+5:30
लोकसभा-विधानसभा निवडणूकीत आचारसंहितेचा भंग होतो अशी तक्रार केल्यावर त्याची तात्काळ दखल घेवून संबंधित तक्रारदाराला त्यावर काय कार्यवाही केली याची माहिती देणारे सी-व्हिजील अॅप भारत निवडणूक आयोगाने तयार केले आहे. लोकसभा निवडणूकीची तयारी म्हणून राज्यातील सर्व ४८ मतदार संघातील

आचारसंहिता भंगाच्या तक्रारीची आता तात्काळ दखल-निवडणूक आयोगाचे अॅप : पुण्यात कार्यशाळा
कोल्हापूर : लोकसभा-विधानसभा निवडणूकीत आचारसंहितेचा भंग होतो अशी तक्रार केल्यावर त्याची तात्काळ दखल घेवून संबंधित तक्रारदाराला त्यावर काय कार्यवाही केली याची माहिती देणारे सी-व्हिजील अॅप भारत निवडणूक आयोगाने तयार केले आहे. लोकसभा निवडणूकीची तयारी म्हणून राज्यातील सर्व ४८ मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण बुधवारपासून (दि.१३ फेब्रुवारी) पुण्याती यशदा केंद्रात होत आहे.
आतापर्यंत आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची किंवा होत असल्याची कोणतेही तक्रार होत असल्यास त्याची तातडीने दखल घेतली जात नव्हती. कारण त्यासाठीची यंत्रणाच नव्हती. त्यामुळे तक्रार झाल्यानंतर पुढे कधीतरी त्याबध्दल चौकशी केली जात असे. त्यामुळे लोकांच्या मनांत आचारसंहिता हा चेष्टेचा विषय बनून गेला होता. सरकारी अधिकारी त्याचा बाऊच जास्त करतात आणि पालन कमी असाच अनुभव येत असे. म्हणून या सर्वांची दखल घेवून निवडणूक आयोगाने हे अॅप विकसित केले आहे.
त्यानुसार समजा, चंदगड तालुक्यात एखादा उमेदवार मतदारांना पैसे वाटतो अशी तक्रार घटनास्थळीच्या फोटोसह त्या अॅपवर केल्यास एकाचवेळी संबंधित मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी व भारत निवडणूक आयोगाचे राज्य अधिकारी यांच्यापर्यंत ही तक्रार जाईल. त्या तक्रारींची लगेच नोंद घेवून जिथून ही तक्रार आली आहे, त्या केंद्रावरील अधिकाºयांस त्याची चौकशी त्याच क्षणाला करावी लागेल व त्यासंबंधीची माहिती लगेच त्याच अॅपवर फिडबॅक म्हणून द्यावी लागेल. अशा तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पथकेच तयार करण्यात येणार आहेत.
निवडणूक तयारीच्या कामाचे अवलोकन करण्यासाठी बुधवार व गुरुवारी यशदामध्ये दोन दिवसांचे प्रशिक्षण होत आहे. त्यामध्ये भारत निवडणूक आयोगाचे राज्य समन्वयक व विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकाºयांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. कोल्हापूरातून नूतन जिल्हाधिकारी दिलीप देसाई व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी नंदकुमार काटकर हे या प्रशिक्षणासाठी जाणार आहेत.