कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कोगे येथील प्राचीन जैन मंदिराजवळ सोहम भांडे ही व्यक्ती बेकायदेशीरपणे उत्खनन करत असल्याचे उघडकीस आले आहे. हे उत्खनन थांबवून संबंधितास योग्य ती समज देण्यात यावी, असे पत्र पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे यांनी करवीर तहसीलदारांना गुरुवारी पाठवले.कोगेतील जैन मंदिर हे पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. या मंदिर परिसरात भांडे या व्यक्तीकडून अवैधरित्या तांत्रिक पद्धतीने उत्खनन होत असल्याचे समाजमाध्यमाद्वारे पुरातत्त्व विभागाला समजले. कोणत्याही प्राचीन स्मारक व मंदिराजवळ तांत्रिक पद्धतीने उत्खनन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची रीतसर परवानगी आवश्यक असते. राज्य पुरातत्त्व विभागासही याबाबत अवगत करणे आवश्यक असते.परंतु संबंधितांनी या उत्खननासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे स्थानिक यंत्रणेला आदेश देऊन हे उत्खनन तातडीने थांबविण्यात यावे आणि भविष्यात या व्यक्तीकडून अशाप्रकारे कोणत्याही प्राचीन स्मारकाजवळ उत्खनन केले जाणार नाही, याबाबत संबंधितास योग्य समज द्यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
जुन्या मूर्ती, रचनेला धक्कायांत्रिक पद्धतीने जर एखाद्या जुन्या स्मारकाच्या किंवा मंदिराच्या ठिकाणी उत्खनन केल्यास गाडल्या गेलेल्या मूर्ती किंवा रचनेला धक्का लागू शकतो. या मूर्तींचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय उत्खननास परवानगी दिली जात नसल्याचे सांगण्यात आले.
Web Summary : Illegal excavation was discovered near the ancient Jain temple in Kolhapur's Koge. The archaeology department instructed officials to halt the excavation by Soham Bhande, as it lacked necessary permissions, potentially damaging buried artifacts. Strict warnings have been issued to prevent future occurrences.
Web Summary : कोल्हापुर के कोगे में प्राचीन जैन मंदिर के पास अवैध उत्खनन का पता चला। पुरातत्व विभाग ने सोहम भांडे द्वारा किए जा रहे उत्खनन को रोकने का निर्देश दिया, क्योंकि इसमें आवश्यक अनुमति का अभाव था, जिससे दबी हुई कलाकृतियों को नुकसान हो सकता था। भविष्य में ऐसी घटनाओं को रोकने के लिए सख्त चेतावनी जारी की गई है।