कोल्हापूर : जिल्हा परिषदेत मोठा अन् छोटा भाऊ कोण, यावरून महायुतीत युद्ध सुरू असले तरी जिल्हा परिषदेत मोठ्या भावाला मोठा मानलं नाही तर आम्ही हाय, असे सांगत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सत्तास्थापनेसाठी अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादी (अजित पवार)ला मदत करण्याची भूमिका सोमवारी मांडली. त्यांचं काय होतंय यावर आमची बारीक नजर असून, खेळ करता आला तर करूच, अशी गुगलीही आमदार पाटील यांनी टाकली.कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस, उद्धवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार काँग्रेस भवनमध्ये खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.आमदार पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेत मोठा व छोटा कोण यावरून त्यांच्यात युद्ध सुरू आहे. आम्ही त्यांच्यावर नजर ठेवून आहे. त्यांनी मदत मागितली तर आमची तयारी आहे.
वाचा : महापौरपद मिळाले, तरच जिल्हा परिषदेत अध्यक्षपद; राष्ट्रवादीचा पवित्रा खासदार शाहू छत्रपती म्हणाले, नूतन सदस्यांनी आपल्या कामातून वेगळा ठसा उमटवावा. जिल्ह्यातील अनेक प्रश्न सभागृहात मांडले तर त्याची साेडवणूक होणार असून, एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या माध्यमातून आवाज उठवा.यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, राजीव आवळे, ए. वाय. पाटील, उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार, राहुल देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विजय देवणे, चेतन नरके, उदयानिदेवी साळोखे, शशिकांत पाटील-चुयेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बयाजी शेळके यांनी स्वागत केले.‘गोकुळ’ची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणारजिल्ह्यातील सहकारी संस्थांचे हित पाहून आम्ही आघाडीतून गतवेळी गोकुळची निवडणूक लढवली होती. यावेळी महाविकास आघाडी म्हणून गोकुळची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सतेज पाटील यांनी केली.
नेटके पायताण ठेवा, निधी मिळेलराजू शेट्टी म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनी हा जिल्हा जात आहे, याचे समाधान वाटते. जिल्ह्यावर शाहू महाराजांचे संस्कार आहेत, हे या निवडणुकीत दिसून आले. सदस्यांनी सभागृहात उपद्रव्य मूल्य दाखवून पायात नेटके पायताण ठेवले तर नक्की निधी मिळेल, असा सल्ला शेट्टी यांनी दिला.
पुतळ्यासाठी दहा लाख रुपयांचा निधीरुई गटातील माणगावमध्ये तुम्ही काँग्रेस उमेदवारावर गुलाल टाका, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी निधी देतो, असा शब्द सतेज पाटील यांनी दिला होता. तेथे काँग्रेसने विजय मिळवल्याने आमदार पाटील यांनी सोमवारी दहा लाख रुपयांचा धनादेश माणगावकरांना पुतळ्यासाठी देत शब्द पूर्ण केला.
Web Summary : Satej Patil hinted at supporting NCP (Ajit Pawar) for Kolhapur ZP power. Raju Shetti advised members to be effective. Gokul election will be fought as Maha Vikas Aghadi. Patil fulfilled promise by giving fund for Shivaji statue.
Web Summary : सतेज पाटिल ने कोल्हापुर जेडपी सत्ता के लिए एनसीपी (अजित पवार) का समर्थन करने का संकेत दिया। राजू शेट्टी ने सदस्यों को प्रभावी होने की सलाह दी। गोकुल चुनाव महा विकास अघाड़ी के रूप में लड़ा जाएगा। पाटिल ने शिवाजी प्रतिमा के लिए निधि देकर वादा पूरा किया।