शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भाजप जिंकण्यासाठी कोणत्याही थरास जाईल; लेखक, संशोधक फिरोज मिठीबोरवाला यांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 11:53 AM

पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी देश तोडण्याचा कट

कोल्हापूर : गेल्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठी ज्याप्रमाणे पुलवामा- बालकोट आतंकवादी हल्ला घडवून आणला, त्याप्रमाणे २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून राम मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिर टार्गेट केले जाईल. विघातक शक्तीसोबत फिक्सिंग करून या दोन्ही ठिकाणांवर हल्ला घडवून निवडणूक जिंकली जाईल, अशी भीती लेखक, संशोधक फिरोज मिठीबोरवाला यांनी सोमवारी व्यक्त केली.लोकजागरतर्फे ‘पुलवामा- बालाकोट : काही तथ्ये आणि काही प्रश्न’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनात व्याख्यान झाले. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे अध्यक्षस्थानी होते. निवृत्त कर्नल सी. जे. रानडे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानात माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ऑनलाइन सहभागी होऊन पुलवामा- बालाकोट हल्ल्यातील वास्तव घटना स्पष्ट केली.मिठीबोरवाला म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधात वातावरण तयार झाले होते. चौकीदार चोर है, राफेलकांड, मोठे कर्जदार देश सोडून पळून जाणे असे मुद्दे चव्हाट्यावर आल्याने भाजप पराभवाच्या छायेत होते. म्हणूनच राजकीय पोळी भाजण्यासाठी पुलवामा बालाकोट हल्ला घडू दिला. हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे राजकीय भांडवल केले. इतर मुद्दे बाजूला पडून मोदींच्या बाजूूने वातावरण तयार झाले. निवडणूक जिंकली. त्यानंतर पुलवामा- बालाकोट हल्लासंंबंधी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र हे सर्व जाणीवपूर्वक टाळण्यात आले आहे. या हल्यातील सूत्रधार अधिकाऱ्यांना शिक्षा देण्याऐवजी बढती देण्यात आली आहे.यावेळी ज्येष्ठ पत्रकार चोरमारे, निवृत्त कर्नल रानडे यांचे भाषण झाले. जीवन बोडके यांनी प्रास्ताविक केले. निहाल शिपूरकर, प्रा. मेघा पानसरे, चंद्रकांत यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

सभागृह तुडुंबव्याख्यान ऐकण्यासाठी सभागृह तुडुंब भरले होते. आसनव्यवस्था अपुरी पडल्याने अनेक श्रोते व्यासपीठावर मांडी घालून बसले होते. माजी राज्यपाल मलिक मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाइन जॉइन झाल्यानंतर त्यांचे श्रोत्यांनी उभे राहून स्वागत केले.

‘जिंदगी बहादूर है’ गाण्याला दादव्याख्यान सुरू असतानाच वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज पुरवठा पुन्हा सुरळीत होईपर्यंत बाबा नदाफ यांनी ‘जिंदगी बहादूर है’ हे गाणे गायिले. त्यास श्रोत्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

तर २०२४ ला लोकसभेत पराभव अटळपुलवामा- बालाकोट हल्ल्यातील सत्य समोर आले तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे. म्हणूनच यावर भाजप काहीही बोलायला तयार नाही, असा आरोप मिठीबोरवाला यांनी केला.

देश तोडण्याचा कटपुलवामा- बालाकोट येथे हल्ला झाला त्यावेळी जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक होते. ते ऑनलाइन सहभागी होत म्हणाले, हल्यासंंबंधित मी सत्य बोलल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मला संपर्क साधून गप्प राहण्याचा सल्ला दिला. राजकीय फायद्यासाठी हा हल्ला घडू दिला. सैनिकांच्या मृतदेहांचे राजकारण केले जात आहे. पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी देश तोडण्याचा कट रचला जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाElectionनिवडणूकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला