शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

संयम सुुटला तर संघर्ष

By admin | Updated: July 18, 2015 00:58 IST

कार्यकर्त्यांचा इशारा : ... मग जाहीर का करत नाही ?

 कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व ज्येष्ठ विचारवंत अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या खुन्यांचा शोध लागावा म्हणून आम्ही आतापर्यंत संयम बाळगला. प्रत्येकवेळी तपास सुरू आहे, धागेदोरे सापडलेत, असे सांगितले जाते; परंतु तपास काय लागला, हे जाहीर होत नाही. त्यामुळे आम्ही किती दिवस वाट पाहायची? धागेदोरे सापडलेत तर मग जाहीर का करत नाहीत? असे प्रश्न करत पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचा संयम सुुटला, तर संघर्ष अटळ आहे’, अशा इशारा राज्य सरकार व पोलीस यंत्रणेला शुक्रवारी ‘भाकप’च्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. डॉ. दाभोळकर व अ‍ॅड. पानसरे यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीवर राहण्याचा आणि दाभोळकरांच्या खुनानंतर कॉँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या तत्कालीन विरोधी पक्षांना आता सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. दाभोळकरांचा खून झाल्यानंतर भाजप नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा मागितला; पण आता गृहमंत्रिपदासह मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे आहे, तर खुनाची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी केली. ‘भाकप’च्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य दिलीप पवार म्हणाले की, खुनाचा तपास लागावा, मारेकऱ्यांना अटक व्हावी म्हणून आतापर्यंत शांत राहिलो. तपास यंत्रणेस मदत करत राहिलो. पाच महिन्यांनंतरही आम्हाला तपास सुरू आहे, धागेदोरे लागले आहेत, असे सांगितले जाते; पण हे किती दिवस ऐकायचे? तपासाची नेमकी दिशा स्पष्ट करा. पोलीस यंत्रणा काय करीत आह,े हे एकदा कळू दे. जर आरोपी सापडत नसतील, तर हा तपास लागणार नाही, हे तरी सांगून टाका. दाभोळकर, पानसरे यांच्या खुनाचा तपास लागत नाही ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तरीही योग्य पद्धतीने तपास सुरु असल्याचे सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा थिल्लरपणा आणि केवळ पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांची टिंगल करण्यातला प्रकार आहे. पोलीस यंत्रणा निव्वळ नाटक, मखलाशी करत असल्याचा आरोप पवार यांनी केला. खून झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध केली. तीन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले असेल, तर आरोपींपर्यंत पोलिसांनी पोहोचायला काय अडचण आहे. खून झाल्यानंतर मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या दूरध्वनीवरील संवादाचे रेकॉर्डिंग करण्यात आले होते का, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. दोन्ही खून हे दहशतवादी कृत्य म्हणून पोलिसांनी जाहीर करावे, अशी मागणी करत, दहशतवादी म्हटले की, त्यांच्या मागे एखादी संघटना असते म्हणूनच या दोन्ही खुनास एक संघटनाच जबाबदार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दररोज आंदोलन करण्यात येईल. यावेळी शहीद दाभोळकर, पानसरे विचार मंच, भाकप, माकप, लाल निशाण पक्ष, श्रमिक प्रतिष्ठान, विद्रोही संघटना, जनता दल, अंनिसंचे कार्यकर्ते सुजाता म्हेत्रे, रमेश वडणगेकर, बाळासो कांबळे, सीमा पाटील, अरुण पाटील, एम. बी. पडवळे, एस. बी. पाटील, धनाजीराव जाधव, बाबा यादव, पंडित ढवळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)