... 'तर माझ्या मतदारसंघातून आलमट्टीच्या धरणात नक्षलवादी तयार झाल्यास शासनच जबाबदार'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 09:01 AM2019-08-10T09:01:55+5:302019-08-10T09:03:07+5:30

कित्येक गावात गेलेल्या बोटी पंक्चर होत्या. कित्येक बोटींचं मॅकेनिज्म बिघडलेलं पाहायला मिळतंय.

... 'If the Naxalites are ready in the Almatti dam from my constituency, dhairyasheel mane mp of kolhapur | ... 'तर माझ्या मतदारसंघातून आलमट्टीच्या धरणात नक्षलवादी तयार झाल्यास शासनच जबाबदार'

... 'तर माझ्या मतदारसंघातून आलमट्टीच्या धरणात नक्षलवादी तयार झाल्यास शासनच जबाबदार'

Next

कोल्हापूर - शिवसेना नेते आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी आलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील आलमट्टी धरणाच्या पाण्याचा विसर्ग त्या पद्धतीने सुरू नसल्याने खऱ्या अर्थानं मृत्युच्या कळा आमच्या लोकांना येत आहेत. 2005 च्या तुलनेत या नैसर्गिक आपत्तीचा विचार केल्यास, बारा पट अधिक पाऊस पडला आहे. प्रसासनाच्या नियोजनात चूक आहे म्हणजे आहेच, असे म्हणत माने यांनी सरकार आणि प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.  

कित्येक गावात गेलेल्या बोटी पंक्चर होत्या. कित्येक बोटींचं मॅकेनिज्म बिघडलेलं पाहायला मिळतंय. बोटीमध्ये बसताना लोकं घाबरतायेत, एकट्या कोल्हापुरात 20 बोटी काम करत होत्या. मात्र, शिरोळ तालुक्यात जिथं हजारो लोकं अडकलेत तिथं केवळ 20 बोटी. हा प्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा आहे. मी स्वत:पासून, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वांनी याची जबाबदारी स्विकारली पाहिजे. पण, प्रशासनाचे खऱ्या अर्थाने कान उघडण्याचे, कान उपटण्याची गरज आहे, अशा शब्दात धैर्यशील माने यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. 

आमचा एखाद जरी माणूस दगावला तरी, त्याला 100 टक्के आम्हीच कारणीभूत आहोत, असे म्हणत माने यांनी सरकारी यंत्रणाही फोल ठरत असल्याची खंत व्यक्त केली आहे. सध्या माणसं जगवणं, त्यांचा जीव वाचवणं हीच प्राथमिकता आहे. त्यानंतर, काय अनुदान द्यायचं, कसं सावरायचं हे पाहता येईल. इचलकरंजी, शिरोळ तालुक्यात अद्यापही पाण्याची पातळी वाढतेय. घरातील लोकं मदतीच्या बोटीची वाट पाहत बसले आहेत. अन्नधान्य संपलंय, केवळ धैर्यशील माने एकटा काहीही करू शकत नाही. प्रशासनाने गंभीर भूमिका घेणं गरजेच असून कलेक्टर ऑफिस शिरोळ तालुक्यात आणलं पाहिजे, असेही धैर्यशील माने यांनी म्हटले. 

आलमट्टी धरणातून होणारा विसर्ग हवा तेवढा नसल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला. माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल, विसर्ग आपला 435 आणि आलमट्टीचा विसर्ग 460 एवढं आहे. म्हणजे केवळ 25 चा डिफरन्स ? 25 च्या या डिफरन्समध्ये आमची गावं बुडून जातील ना. दोन राज्यांचा हा लवाद आहे, दोन्ही राज्यांनी एकमेकांशी चर्चा करून किती विसर्ग करायचा हे ठरवावं. त्यांची बुडतील म्हणून जर आमची बुडवत असतील तर पुढं, इथं माझ्या मतदारसंघातून नक्षलवादी जर आलमट्टीच्या धरणामध्ये तयार झाले तर, त्याला शासन जबाबदार आहे, असं माझं प्रामाणिक मत असल्याचा तीव्र संताप धैर्यशील माने यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, कोल्हापूर येथील पूरस्थिती काही प्रमाणात ओसरली असली तरी, अद्यापही सांगलीतील पूरस्थिती कायम आहे. नागरिकांना मदतीचा हात हवाय, राज्यभरातून मदत मिळतेय, तरीही आणखी मदतीची गरज आहे.  
 

Web Title: ... 'If the Naxalites are ready in the Almatti dam from my constituency, dhairyasheel mane mp of kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.