इचलकरंजीत युवकाचा दगडाने मारहाण करून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 13:59 IST2019-12-28T13:57:06+5:302019-12-28T13:59:15+5:30
इचलकरंजी येथील आरगे भवन परिसरात किरकोळ कारणावरून दोघा मित्रांनी एकाचा दगडाने मारहाण करून खून केल्याचे उघडकीस आले. हैदर शहानुर कलावंत (वय 24 रा. गणेशनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

इचलकरंजीत युवकाचा दगडाने मारहाण करून खून
ठळक मुद्देइचलकरंजीत युवकाचा दगडाने मारहाण करून खून गावभाग पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
इचलकरंजी : येथील आरगे भवन परिसरात किरकोळ कारणावरून दोघा मित्रांनी एकाचा दगडाने मारहाण करून खून केल्याचे उघडकीस आले. हैदर शहानुर कलावंत (वय 24 रा. गणेशनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. हल्ला केल्यानंतर हैदर याला दोघे मोटारसायकल वरून घेऊन जात असताना गृहरक्षक दलाचे जवान व नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली.
या प्रकरणी गणेश नारायण इंगळे (वय 23 रा गौरीशंकर नगर खोतवाडी) व योगेश हणमंत शिंदे (वय 23 रा गणेशनगर) या दोघांना गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.