शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’साठी इचलकरंजीची तयारी

By admin | Updated: July 15, 2015 21:25 IST

दहा वर्षांत वेगाने वाढणारे शहर असा नावलौकिक आहे. येथे वस्त्रोद्योगाच्या वाढीला पोषक वातावरण आहे.

इचलकरंजी : केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’चे निकष पाहता  आणि राज्यातील वस्त्रोद्योगातील अग्रेसर शहर म्हणून इचलकरंजीचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होऊ शकतो. त्यामुळे नगरपालिकेतील खातेप्रमुखांनी विहीत नमुन्यात अहवाल तयार करावा, असे निर्देश मुख्याधिकारी सुनील पवार यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांना दिले.‘स्मार्ट सिटी’मध्ये राज्यातील दहा शहरे निवडली जाणार आहेत. त्यासाठी असलेले निकष पाहता इचलकरंजीची निवड होऊ शकते. तसेच इचलकरंजी हे देशातील वस्त्रोद्योगात अग्रेसर असलेले शहर आहे. येथील दरडोई उत्पन्नही लक्षणीय असून, अलीकडील दहा वर्षांत वेगाने वाढणारे शहर असा नावलौकिक आहे. येथे वस्त्रोद्योगाच्या वाढीला पोषक वातावरण आहे. सूतगिरण्या, सायझिंग कारखाने, यंत्रमाग-आॅटोलूम्स, प्रोसेसर्स कारखाने आणि सूत व कापड व्यापारी पेढ्या ही वस्त्रोद्योगाची साखळी इचलकरंजीत स्वयंपूर्ण आहे. आर्थिक पुरवठा करणाऱ्या बॅँका, ‘डीकेटीई’सारखी शैक्षणिक व संशोधन करणारी संस्था, त्यांच्याकडे असलेले नॉन ओव्हन टेक्स्टाईलचे केंद्र यादृष्टीनेही या वस्त्रनगरीत पूर्तता आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने ‘निर्यातीभिमुख’ केंद्राचा दर्जा इचलकरंजीस दिला आहे. त्यादृष्टीने स्मार्ट सिटीसाठी प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे.वास्तविक पाहता येथील लोकप्रतिनिधी व नगरपालिका यांनी स्मार्ट सिटीसाठी जोरदार प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी उद्योजक व नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)