कोरोनामुळे कोल्हापुरातील इचलकरंजीच्या वृध्देचा मृत्यू, नवे सहा तर स्वाईन फ्लूचे ३ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 11:56 IST2023-03-22T11:55:46+5:302023-03-22T11:56:19+5:30

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४० वर

Ichalkaranji old man died in Kolhapur due to Corona, 6 new ones and 3 swine flu patients | कोरोनामुळे कोल्हापुरातील इचलकरंजीच्या वृध्देचा मृत्यू, नवे सहा तर स्वाईन फ्लूचे ३ रुग्ण

कोरोनामुळे कोल्हापुरातील इचलकरंजीच्या वृध्देचा मृत्यू, नवे सहा तर स्वाईन फ्लूचे ३ रुग्ण

कोल्हापूर : गेल्या २४ तासात कोरोनाचे नवे सहा रुग्ण नोंदवण्यात आले असून, स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४० झाली आहे. दरम्यान, इचलकरंजी चंदूर रोड येथील ६७ वर्षीय वृध्देचा कोरोनामुळे इचलकरंजीतीलच एका खासगी रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या २४ तासात कोल्हापूर शहरात चार तर करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील प्रत्येकी एका नागरिकाला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर नाही. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवसभरामध्ये स्वाईन फ्लूची तिघांना लागण झाली असून, एकूण सात रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

Web Title: Ichalkaranji old man died in Kolhapur due to Corona, 6 new ones and 3 swine flu patients