शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Child marriage in kolhapur: साखरपुडा म्हणून बालविवाह उरकला, पोलिसांचीच दिशाभूल; इचलकरंजीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 13:17 IST

मुलीचे समुपदेशन केल्यानंतर तिने रविवारी आपला बालविवाह झाल्याचे सांगितले

कोल्हापूर : इचलकरंजी येथील १७ वर्षीय मुलीचा रविवारी सायंकाळी साखरपुडा म्हणून बालविवाह उरकण्यात आला. पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर मुला-मुलीच्या पालकांनी आम्ही मुलीचा फक्त साखरपुडा करणार होतो, तोदेखील करणार नाही, असे खोटे सांगितले. मात्र, सोमवारी मुलीला बालकल्याण समितीसमोर सादर केल्यानंतर तिने आपला बालविवाह झाल्याचे सांगितले.इचलकरंजी येथील १७ वर्षे ६ महिने वय असलेली ही मुलगी आपल्या आजीसोबत राहत होती. आई परगावी असते, वडील नाहीत. या मुलीचे रविवारी लग्न होणार असल्याची याची माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांना समजली. त्यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांना कळविले. सायंकाळी ६ वाजता पोलीस घटनास्थळी गेले त्याआधीच कुटुंबीयांना याची कल्पना आली होती. त्यांनी आधीच मुलीचे लग्न उरकले.पोलीस आल्यावर त्यांना आम्ही मुलीचा साखरपुडा करणार होतो, पण आता तुम्ही बालविवाह कायद्याची माहिती दिल्याने साखरपुडादेखील करणार नाही, असे खोटे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून पोलीस निघून गेले. सोमवारी सकाळी मुलीला पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले. तेथे समुपदेशनासाठी आलेले अवनी जागर प्रकल्पाचे समन्वयक प्रमोद पाटील यांनी कायद्याची माहिती देऊन मुलीला, मुलाला व पालकांना बालकल्याण समितीसमोर सादर केले.येथे मुलीचे समुपदेशन केल्यानंतर तिने रविवारी आपला बालविवाह झाल्याचे सांगितले. बालकल्याण समितीच्या वतीने याबाबतचा अहवाल बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना पाठवून पालकांवर गुन्हा नोंद करण्याची शिफारस करण्यात येईल, त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.

मुलगी आजीच्या ताब्यात

मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिला सासरी पाठविले जाणार नाही, असे तिची आजी व आईकडून लिहून घेण्यात आले आहे. तसेच दर महिन्याला तिला बालकल्याण समितीसमोर हजर करावे लागणार आहे. हे बंधपत्र लिहून घेतल्यानंतर मुलीला आजीच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस