Kolhapur Politics: एकटं पडलो, पण टीव्ही फोडला नाही; धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:37 IST2025-06-17T12:36:39+5:302025-06-17T12:37:30+5:30

विधान परिषदेचा आमदार भाजपचाच होणार

I was left alone but I didn't break the TV Dhananjay Mahadik attack on Satej Patil | Kolhapur Politics: एकटं पडलो, पण टीव्ही फोडला नाही; धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांना टोला

Kolhapur Politics: एकटं पडलो, पण टीव्ही फोडला नाही; धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांना टोला

कोल्हापूर : आम्ही एकटे पडण्याचे अनेक प्रसंग आले. लोकसभेला माझा घात झाला. अमल आणि सम्राट यांचा पराभव झाला. ‘गोकुळ’मधील सत्ता गेली. विधानपरिषदही गेली. पण आम्ही निराश झालो नाही. टी.व्ही. फोडला नाही की गाव सोडून गेलो नाही, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला.

नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षातील कामकाजाची माहिती देण्यासाठी भाजप कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आता ‘गाेकुळ’ महायुतीच्या ताब्यात येणार असून विधानपरिषदेचा आमदारही भाजपचाच असेल, असाही दावाही त्यांनी केला.

महाडिक यांना सुरुवातीलाच सतेज पाटील यांच्या ‘मी एकटा पडलोय’ या विधानाबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी याबाबत आपण काही बोलणार नसल्याचे सांगितले. मात्र पत्रकार परिषद संपताना पुन्हा ‘तुम्हाला कधी एकटा पडल्यासारखे वाटलेय का’ असा प्रश्न विचारल्यानंतर मात्र त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, एकापाठोपाठ एक पराभव झाले. त्या-त्या वेळी लोकांची भूमिका असते. पण आम्ही खचलो नाही. लोकांच्या कामात राहिलो. त्यामुळे मी पुन्हा खासदार झालो, अमल आमदार झाले.

दिवस मावळला तरी दुसऱ्या दिवशी सूर्य उगवतो यावर माझा विश्वास आहे. ‘गोकुळ’मध्ये ‘त्यांचे’ काही संचालक आहेत. त्यामुळे त्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आता आमचीही माणसे भेटायला जातील. राजू शेट्टी यांनी कारागृहातील गैरकारभाराचे पुरावे जर मुख्यमंत्र्यांना दिले असतील तर नक्कीच कारवाई होईल, असेही महाडिक यांनी सांगितले.

आताच आमच्याकडे गर्दी..

कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेत अनेकांचा प्रवेश होणार असल्याबाबत विचारणा केली असता महाडिक म्हणाले, भाजपमध्येही लवकरच प्रवेश होणार आहेत. परंतु मुळात आमच्याकडे माणसेच जास्त आहे. एखाद्या प्रभागात भाजपचा इच्छुक कार्यकर्ता असेल तर आम्हांला इतरांना प्रवेश देताना याचा विचार करावा लागेल.

Web Title: I was left alone but I didn't break the TV Dhananjay Mahadik attack on Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.