शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: माझं काही नाही... ए. वाय. आणि मंत्री मुश्रीफ यांचेच वांदे; के. पी. पाटील यांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:32 IST

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरण लवकर करा

कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये कुपेकर बहीण-भावाला, प्रकाश चव्हाण व अमर चव्हाण यांना एकत्र आणले त्याप्रमाणे ‘राधानगरी’मध्ये ‘के. पी. - ए. वाय.’ यांना एकत्र आणा म्हणजे जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळकटी मिळेल आणि अजित पवार यांना दिलेला शब्द पूर्ण करा, असे माजी आमदार राजेश पाटील यांनी आवाहन केले. तोच धागा पकडत माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, माझे आणि दाजी (ए. वाय. पाटील) यांचे काही नाही, ‘ए. वाय.’ व मुश्रीफ यांचे वांदे आहेत. परवा तर जिल्हा परिषदेच्या निकालादिवशी थेट मुश्रीफ यांच्या विरोधातच शड्डू ठोकला.जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार समारंभात जोरदार टोलेबाजी रंगली. आपल्या रांगड्या शैलीत के. पी. पाटील म्हणाले, राजेश पाटील तुमची ताकद वाढली पण आमचा विधानसभेत ४२ हजारांनी पराभव झाल्यानंतर जिल्हा परिषदेला माणसं उभा करायला मिळेनात. एकीकडे पालकमंत्री तर दुसऱीकडे मंत्री चंद्रकांत पाटील ठिय्या मारून बसले होते. त्यांची सगळ्या प्रकारची ताकद लावल्याने आम्ही संकटात आलो. त्यामुळे पदांचे वाटप करताना जरा आमच्या दुष्काळी भागाकडे बघा.जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी मालेपासून तळसंदेपर्यंत परफेक्ट नियोजन केले आणि विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला. पदे देताना पन्हाळा, शाहूवाडी मधील डोंगर कपाऱ्यांतील सदस्यांकडे लक्ष द्या. ‘कळे’, ‘कोतोली’ मतदारसंघात राहुल पाटील यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन आमच्या विरोधकांना पाठिंबा दिला, हे योग्य नसून ताठ मानेने काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.करवीरमध्ये नरकेंची काँग्रेसशी छुपी युती : राहुल पाटीलजिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील म्हणाले, ‘करवीर’मध्ये आमचे विरोधक चंद्रदीप नरके यांची कॉंग्रेसशी छुपी हातमिळवणी होती. निगवे खालसामध्ये नरकेंनी कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने आमचा उमेदवार थोडक्यात पराभूत झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पन्हाळ्यात निर्णय घेतला. अनेक अडचणी आल्या पण मंत्री हसन मुश्रीफ यांची ताकद आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या आशीवार्दाने यश मिळाले. यावेळी, ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ, मानसिंगराव गायकवाड, अरुण डोंगळे आदी उपस्थित होते.आसुर्लेकरांना ‘के. पीं’.च्या शुभेच्छापन्हाळ्यात बाबासाहेब पाटील-आसुर्लेकरांनी आमचे मित्र आणि डॉनला बाजूला करून तीन जागा जिंकल्या व पंचायत समिती ताब्यात घेतली. ‘बाबासाहेब’ तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो, असे के. पी. पाटील यांनी सांगितले.दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरण लवकर करादिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा १९ जानेवारीला मला फोन करून चंदगडमध्ये तुम्ही काेणत्या चिन्हावर लढणार असे विचारले. क्षणाचाही विलंब न करता ‘घड्याळ’ चिन्हावर लढण्याची तयारी दाखवली. एकत्रीकरणाचा ‘चंदगड’ पॅटर्नने महाराष्ट्राला दिशा दिली. राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावर लवकर निर्णय घ्या, असे आवाहन नंदिनी बाभूळकर यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Politics: KP Patil targets Mushrif, hints at internal issues.

Web Summary : Ex-MLA KP Patil's jab at Minister Mushrif suggests discord within NCP, while leaders discuss party unity, internal rivalries, and strategies for upcoming elections in Kolhapur.