शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

मी गाडगेबाबा अभियानांतर्गत ५ टन प्लास्टिक संकलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:32 PM

Plastic ban KolhapurNews- मी गाडगेबाबा या अभियानांतर्गत शहरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले गेले. यामध्ये १५०० नागरिकांनी सहभाग घेतला, तर २० स्वयंसेवी संस्था यामध्ये सक्रिय होत्या. एका तासात सुमारे ५ टन प्लास्टिक संकलित करण्यात आले.

ठळक मुद्देमी गाडगेबाबा अभियानांतर्गत ५ टन प्लास्टिक संकलित१५०० नागरिक सहभागी, २० स्वयंसेवी संस्था सक्रिय

कोल्हापूर : मी गाडगेबाबा या अभियानांतर्गत शहरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले गेले. यामध्ये १५०० नागरिकांनी सहभाग घेतला, तर २० स्वयंसेवी संस्था यामध्ये सक्रिय होत्या. एका तासात सुमारे ५ टन प्लास्टिक संकलित करण्यात आले.संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त अर्थ वॉरियर्स संस्थेकडून हे अभियान राबवले. अर्थ वॉरियर्सचे निमंत्रक सुबोध भिंगार्डे, डॉ. सूर्यकिरण वाघ, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, ॲड. केदार मुनिश्‍वर, तृत्पी देशपांडे, आदिती गर्गे, प्र. द. गणफुले, महापालिका आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, राहुल राजगोळकर हे सहभागी झाले होते.महापालिका उद्यान विभागाच्या १२६ कर्मचाऱ्यांनी शहरातील ५४ उद्यानांतून ७० पोती प्लास्टिक कचरा संकलित केला. यामध्ये उद्यान निरीक्षक अरुण खाडे, राम चव्हाण, अनिकेत जाधव हे सहभागी झाले होते. शहरालगतच्या ग्रामपंचायतीमधून २२०० किलो प्लास्टिक संकलित झाले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २३ ग्रामपंचायतींमधील कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनीही या अभियानात सहभाग घेतला होता. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात अभियानाची सुरुवात झाली.

विद्यापीठात १० पोती प्लास्टिक संकलित केले. किर्लोस्कर उद्योग समूहातील धीरज जाधव, राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी पंचगंगा पूल ते वडणगे फाटा येथेपर्यंत ४० पोती प्लास्टिक संकलित केले. महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे यांनी सर्व प्लास्टिक संकलन आणि निर्मूलनाची व्यवस्था केली.उपक्रमात सहभागी संस्थाकिर्लोस्कर उद्योग समूह, क्रीडाई, वृक्षप्रेमी, निसर्ग मित्र, गार्डन क्‍लब, स्वरा फाउंडेशन, रोटरी क्‍लब, समृद्धी विकास मंच, जरग फाउंडेशन, चांगुलपणाची चळवळ, खाटिक समाज, फेरीवाला संघटना, वुई केअर सोशल फौंडेशन, प्लास्टिक रिसायकल प्रोजेक्‍ट, करवीर नगर वाचन मंदिर, के.डी.एम.जी, स्वयंप्रभा मंच. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर