मी ठाकरे कुटुंबाचा निष्ठावंत...; शिवसैनिकच काँग्रेसचा आमदार निवडून आणतील - राजेश क्षीरसागर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 20:31 IST2022-03-20T20:30:26+5:302022-03-20T20:31:32+5:30
कोल्हापूर उत्तर मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत क्षीरसागर यांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण...

मी ठाकरे कुटुंबाचा निष्ठावंत...; शिवसैनिकच काँग्रेसचा आमदार निवडून आणतील - राजेश क्षीरसागर
कोल्हापूर- मी कडवा शिवसैनिक आहे. ठाकरे कुटुंबाचा निष्ठावंत आहे. यामुळे त्यांनी टाकलेला शब्द खाली पडू देणार नाही. शिवसैनिकच काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना निवडून आणतील, अशी ग्वाही शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी रविवारी कार्यकर्त्यासमोर बोलताना दिली.
कोल्हापूर उत्तर मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत क्षीरसागर यांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. कार्यकर्त्यांचा तसा दबाव होता. परंतु महाविकास आघाडीच्या धोरणानुसार ही जागा दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे काँग्रेसचे असल्याने त्याच पक्षाच्या वाट्याला गेली. त्यानंतर नाराज झालेले क्षीरसागर नॉट रीचेबल होते. यामुळे ते कोणता निर्णय घेतात याबद्दल उत्सुकता होती.