शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: ..अन् पतीनेच केला पत्नीचा खून, मडिलगेतील दरोड्याच्या बनावाचे कसं फुटलं बिंग.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 12:47 IST

गुण्यागोविंदाने चाललेला संसार उद्ध्वस्त

आजरा : मडिलगे (ता. आजरा) येथे रविवारी पडाटे दरोडा पडलाच नव्हता. पत्नीचा खून पचविण्यासाठी पतीनेच दरोड्याचा बनाव रचला होता. मात्र मृतदेहावरच्या दागिन्यांनी, त्याने सांगितलेली हकिकत आणि घटनास्थळावरील परिस्थिती यातील विसंगती पाहून पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी फिर्यादी पतीचीच चौकशी सुरू केली.पोलिसी खाक्याही दाखविला तरीही बधत नाही म्हटल्यावर दीड वर्षाच्या लेकरांचा व वृद्ध आईचे काय होणार, असे विचारताच भावनावश होऊन त्याचा निर्धार ढासळला आणि त्याने पत्नीचा खून आपणच केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयित आरोपी पती, मडिलगेचा माजी उपसरपंच सुशांत सुरेश गुरव याला अटक केली आहे.

वाचा- आई कुणा म्हणू मी..; आई गेली देवाघरी, बापाची जेलवारीमडिलगे (ता. आजरा) येथील पूजा सुशांत गुरव यांच्या खुनाचा तपास आजरा पोलिस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २४ तासात उघड केला आहे. संशयित आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले व सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांनी दिली.

वाचा - महाराज.. हे काय केलं तुम्ही!, मडिलगेतील खुनाच्या उलगड्यानंतर पंचक्रोशी झाली सुन्नरविवारी पहाटे २.३० वाजता घरात दरोडा पडला असून, दरोडेखोरांनी पत्नीचा धारदार हत्याराने खून केला तसेच सोने व रोख रक्कम लंपास केल्याची फिर्याद सुशांत गुरव याने आजरा पोलिसांत दिली होती. त्याआधारे पोलिसांचा तपास सुरू होता. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. सोमवारी सकाळी संशयिताकडे दीड वर्षाच्या मुलाबाबत सहानुभूतीने विचारणा करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

कर्ज फेडण्यासाठी दागिने न दिल्यानेच खूनकर्जाची परतफेड करण्यासाठी तुझे दागिने गहाण ठेवायला दे, अशी मागणी संशयिताने पूजाकडे केली. पूजाने दागिने देण्यास नकार देताच दोघांमध्ये वादावादी झाली. यातूनच सुशांतने दगड व खोऱ्याने पूजाच्या डोक्यात गंभीर वार केले. यात ती जागीच ठार झाली . हा खून पचविण्यासाठी संशयिताने दरोड्याचा बनाव केला; मात्र हा बनाव पोलिसांनी २४ तासात उघड केला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर करीत आहेत.

गुण्यागोविंदाने चाललेला संसार उद्ध्वस्तसंशयित आचारी, कीर्तनकार व पौरोहित्याचे काम करीत होता. त्यांनी बारामतीच्या डॉक्टरांकडे १२ फेऱ्या मारल्यानंतर सोपान व मुक्ता ही दोन जुळी मुले झाली. संसार चांगला चाललेला असताना रागाने केलेल्या मारहाणीत पूजाचा मृत्यू झाला आणि संसार उद्ध्वस्त झाला.

अन् संशयाची सुई फिर्यादीकडे वळलीफिर्याद देताना आरोपीने दरोडेखोरांनी पत्नी पूजाच्या डोक्यात रॉडने वार केल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात धारदार हत्याराने वार केल्याचे पोलिसांना आढळले. दागिने दरोडेखोरांनी नेले असे म्हटले होते. मात्र मृतदेहाच्या मंगळसूत्र, बांगड्या अंगावर तसेच कपाटातील दागिने जसेच्या तसे होते. साड्या विस्कटल्या होत्या, मात्र त्यावर जखमांचे रक्त पडलेले नव्हते. या विसंगतीमुळेच पोलिसांच्या संशयाची सुई फिर्यादी पतीवर गेली आणि या खुनाचा छडा लागला.

हत्यार फेकले गोबर गॅसमध्येखोऱ्याने पूजाच्या डोक्यात गंभीर वार करू तिला रक्ताच्या थारोळ्यात घरातच टाकले व वापरलेले हत्यार संशयिताने गोबर गॅसमध्ये नेऊन टाकले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस