पत्नीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच पतीचे निधन, कोल्हापुरातील देशपांडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 13:39 IST2023-07-08T13:38:46+5:302023-07-08T13:39:58+5:30

आईचे रक्षाविसर्जन करून घरी आलेल्या मुलांना पुन्हा वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पंचगंगा घाटावर जावे लागले

Husband death on the day of his wife funeral, Incidents in Kolhapur | पत्नीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच पतीचे निधन, कोल्हापुरातील देशपांडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

पत्नीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच पतीचे निधन, कोल्हापुरातील देशपांडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

कोल्हापूर : पत्नीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच पतीचे निधन झाल्याने काशिद कॉलनी, सानेगुरुजी वसाहतीमधील देशपांडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला.

लिप्टन बुक ब्रॉंड कंपनीतून अधिकारी म्हणून निवृत्त झालेले सदानंद देशपांडे यांच्या पत्नी सुरेखा वय ७७ यांचे रविवारी, २ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता निधन झाले. त्यांचे रक्षाविसर्जन मंगळवारी ४ जुलै रोजी सकाळी करण्यात आले. घरात नातेवाईक होतेच. अशातच दुपारी साडेतीन वाजता सदानंद देशपांडे वय ८४ यांचेही निधन झाले.

आईचे रक्षाविसर्जन करून घरी आलेल्या मुलांना पुन्हा वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पंचगंगा घाटावर जावे लागले. देशपांडे हे मूळचे आजरा तालुक्यातील भादवणवाडीचे आहेत. पुणे येथे कार्यरत मनुष्यबळ व्यवस्थापक समीर देशपांडे आणि सारस्वत बॅंकेतील राजारामपुरी शाखेतील वरिष्ठ शाखाधिकारी शिशिर देशपांडे यांचे ते आईवडील होत.
 

Web Title: Husband death on the day of his wife funeral, Incidents in Kolhapur