तीन खानांचेच पिक्चर कसे चालतात?, हे तर षड्यंत्र: नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 13:12 IST2023-03-25T12:46:57+5:302023-03-25T13:12:50+5:30

‘लव्ह जिहाद’ हे हिंदूवरचे आक्रमणच

How does the picture of the three Khans work, Question by Nitesh Rane in Hedgewar lecture series in Kolhapur | तीन खानांचेच पिक्चर कसे चालतात?, हे तर षड्यंत्र: नितेश राणे

तीन खानांचेच पिक्चर कसे चालतात?, हे तर षड्यंत्र: नितेश राणे

कोल्हापूर : भारताला २०४७ पर्यंत इस्लाम राष्ट्र करण्यासाठीच एक प्रयत्न म्हणून सुरू असलेला लव्ह जिहाद हे एक प्रकारचे हिंदू समाजावरील आक्रमणच आहे, असे स्पष्ट मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.

हिंदू व्यासपीठ आणि लोक उत्कर्ष समितीतर्फे आयोजित डॉ. के. ब. हेडगेवार व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उदय सांगवडेकर, प्रमोद ढोले, सूर्यकिरण वाघ उपस्थित होते.

राणे म्हणाले, अनेक घटनांमध्ये मुस्लीम युवक फसवून हिंदू मुलींना टार्गेट करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. याची असंख्य उदाहरणे आहेत. सुरुवातीला खोटी नावे सांगून, बोगस कागदपत्रे जोडून हिंदू मुलींशी लग्ने केली जातात. नंतर मात्र खरी ओळख सांगून त्या मुलीला मुस्लीमांसारखे वागण्यासाठी अत्याचार केला जातो. अशा अनेक मुली सौदीला नेऊन विकल्याची उदाहरणे आहेत.

कोल्हापूरमध्ये ज्याने हिंदू अल्पवयीन मुलीला नेले तोच तिच्या वडिलांना तुमच्या मुलीचे तुकडे करीन म्हणून व्हॉटसॲपवरून मेसेज पाठवतो. हे कशाचे लक्षण आहे. म्हणून हिंदूंनी जागरूक होण्याची गरज आहे.

तीन खानांचेच पिक्चर कसे चालतात

राणे म्हणाले, हिंदू मुलीलाच पुढे करून हा मुलगा बघ कसा शाहरूख खानसारखा दिसतोय, त्याचे केस बघ कसे आमिर खानसारखे आहेत असे सांगितले जाते. हे तीन खान. यांचेच पिक्चर कसे चालतात. अक्षयकुमार, ऋतिक रोशनचे का चालत नाहीत. हे सुद्धा एक षडयंत्र आहे.

Web Title: How does the picture of the three Khans work, Question by Nitesh Rane in Hedgewar lecture series in Kolhapur