शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ५० लाख मतदार वाढले कसे, खासदार विशाल पाटील यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:15 IST

निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते आहेत का?

कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पारदर्शीपणे झाल्या नसून लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या सहा महिन्यांत राज्यात ५० लाख मतदार वाढले कसे, असा सवाल सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला.विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कृत्याविरोधात, लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेसच्या वतीने स्टेशन रोडवर निदर्शने करण्यात आली. यानंतर खासदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.विशाल पाटील म्हणाले, २०१९ ची व २०२४ ची निवडणूक या पाच वर्षांत ५ लाख मतदार वाढले होते. मात्र, २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूक कालावधीत ५० लाख मतदार वाढले कसे, याची माहिती आयोगाने द्यावी. विधानसभा मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेनंतर वाढलेली ७६ लाख मते संशयास्पद आहेत. ही मते कशी वाढली, याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकलेला नाही.

गाफील राहिलो त्यामुळे पराभवनिवडणुकीच्या कालावधीत भाजप मतदारवाढीसाठी प्रयत्न करत होते. यावेळी काँग्रेसने दक्ष राहणे गरजेचे होते. मात्र, त्या काळात काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. शिवाय लोकसभा निवडणुकीच्या यशामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही गाफील राहिल्याने विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याची कबुलीही खासदार पाटील यांनी दिली.आयुक्त भाजप कार्यकर्ते आहेत का?सध्याचे निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. ईव्हीएमविरोधात पुरावे गोळा करत असून त्यानंतरही ही लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल वेगळा असेलजिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस ताकतीने उतरणार असून, हा निकाल काँग्रेसच्या बाजूने असेल, असा विश्वासही विशाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvishal patilविशाल पाटीलElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा