ताराराणी चौकातील हॉटेलला आग; सत्तर हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 17:56 IST2020-01-23T17:55:48+5:302020-01-23T17:56:49+5:30

ताराराणी चौकातील अयोध्या पार्क येथील हेवन पिझ्झा अ‍ॅँड कॅफे या हॉटेलला गुरुवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग अग्निशमन दलाने १५ मिनिटांत विझविली.

Hotel fire in Tararani Chowk Loss of seventy thousand | ताराराणी चौकातील हॉटेलला आग; सत्तर हजारांचे नुकसान

कोल्हापुरातील ताराराणी चौकातील हेवन पिझ्झा या हॉटेलला गुरुवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग विझविण्याचे काम अग्निशमन दलातर्फे सुरू होते.

ठळक मुद्देताराराणी चौकातील हॉटेलला आग सत्तर हजारांचे नुकसान

कोल्हापूर : ताराराणी चौकातील अयोध्या पार्क येथील हेवन पिझ्झा अ‍ॅँड कॅफे या हॉटेलला गुरुवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग अग्निशमन दलाने १५ मिनिटांत विझविली.

याबाबत अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या हॉटेलमधील ओव्हन व अन्य इलेक्ट्रिक साहित्याला शॉर्ट सर्किटमुळे गुरुवारी सकाळी आग लागली. त्याची वर्दी मालक संगीता पुरोहित यांनी अग्निशमन दलाला देताच तत्काळ तीन बंब या ठिकाणी आले.

सकाळची वेळ असल्याने हॉटेलमध्ये गर्दी होती. आतमध्ये आग लागल्याचे कळताच सर्व ग्राहक व कर्मचारी तत्काळ हॉटेलबाहेर पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ पावले उचलीत ही आग १५ मिनिटांत विझविली. त्यामुळे अनर्थ टळला.

आतमध्ये मोठ्या प्रमाणात साठलेला धूर अग्निशमन दलाच्या जवानांनी ब्लोअरद्वारे बाहेर काढला. यावेळी स्थानक अधिकारी कांता बांदेकर, उमेश जगताप, वामन चोरे, मेहबूब जमादार, चंद्रकांत पाटील, पवन कांबळे, कपिल यादव, सुशांत जोंधळे, उमाजी निकम, आदींनी ही आग विझविण्यास साहाय्य केले.

 

 

Web Title: Hotel fire in Tararani Chowk Loss of seventy thousand