Kolhapur: सासनकाठी डोक्यात पडून होमगार्ड जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 12:10 IST2025-04-12T12:08:28+5:302025-04-12T12:10:21+5:30

कोल्हापूर : चैत्र यात्रेनिमित्त जोतिबा डोंगर येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या होमगार्डच्या डोक्यात सासनकाठी पडल्याने जखमी झाल्या. आशाराणी मारुती पाटील ...

Home guard injured after falling on head with a crowbar | Kolhapur: सासनकाठी डोक्यात पडून होमगार्ड जखमी

Kolhapur: सासनकाठी डोक्यात पडून होमगार्ड जखमी

कोल्हापूर : चैत्र यात्रेनिमित्त जोतिबा डोंगर येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या होमगार्डच्या डोक्यात सासनकाठी पडल्याने जखमी झाल्या. आशाराणी मारुती पाटील (वय ४५, रा. शाहूवाडी) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. होमगार्ड पाटील बंदोबस्तासाठी असताना सासनकाठी डोक्यात पडली. त्यात त्या जखमी झाल्याने त्यांच्यावर जोतिबा डोंगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. तेथून त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले.

२ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा

यात्रेसाठी गुरुवारीच पोलिस बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षक, उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, महिला पोलिस, वाहतूक पोलिस, शीघ्र कृती दल, होमगार्ड , राखीव पोलिस दल असे २ हजारांवर पोलिस तैनात आहे.

डोंगर परिसर लाखो भाविकांनी फुलला 

डोंगर परिसर लाखो भाविकांनी फुलला आहे. गुलालाची उधळण आणि ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करताना सासनकाठी नाचवत भक्त देवाच्या भक्तीत लीन झाले आहे. देवाची सासनकाठी देहभान विसरून नाचवताना त्याच्या भक्तीत मिळणारा परमानंद वर्षभराची ऊर्जा देतो. दुसरीकडे यात्रा सुरक्षित व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा-पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. 

मंदिर परिसरावर १४० कॅमेऱ्यांचा वॉच

मंदिर आवार आणि पार्किंग ठिकाणी १४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे तसेच दोन डोअर मेटल डिटेक्टर मंदिराच्या मुख्य दर्शन रांगेत असतील. मंदिर गाभाऱ्यातील भाविक व बाह्य परिसरातील भाविक संख्येसाठी लाईन क्रॉसिंगसाठी एआय कॅमेरे आहेत. घरबसल्या भाविकांना हा सोहळा पाहता यावा यासाठी देवस्थान समितीच्या सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. 

Web Title: Home guard injured after falling on head with a crowbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.